इगतपुरी शहर : मध्य रेल्वेच्या इगतपुरी जवळील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार ( ता. ३ रोजी ) सकाळी ८.३० वाजता दरड कोसळली. दरड कोसळताना ती ओव्हर हेड वायर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. (crack collapsed near tunnel on railway line going to Mumbai in Kasara Ghat)
या घटनेमुळे अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळण्यात आली आहे. अगोदर थोड्या वेळापूर्वीच पंचवटी एक्स्प्रेस येथुन पास झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.