NMC News : महापालिकेची पत ‘जैसे-थे’; अपूर्णावस्थेतील प्रकल्पांमुळे पुढे सरकेना ‘रेटिंग

NMC : क्रिसिलच्या आर्थिक सर्वेक्षणात महापालिकेला ‘एए-मायनस’ असे मागील वर्षी देण्यात आलेल्या रेटिंगमध्ये तसूभरही फरक पडला नाही.
NMC
NMC esakal
Updated on

NMC News : क्रिसिलच्या आर्थिक सर्वेक्षणात महापालिकेला ‘एए-मायनस’ असे मागील वर्षी देण्यात आलेल्या रेटिंगमध्ये तसूभरही फरक पडला नाही. यंदाच्या वर्षातही तेच रेटिंग कायम असून, रेटिंग सुधारण्यासाठी महापालिकेला अपूर्णावस्थेतील प्रकल्प पूर्ण करावे लागण्याबरोबरच कामकाजात सुधारणा करावी लागणार आहे. क्रिसिल या संस्थेतर्फे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन रेटिंग निश्‍चित केले जाते. (Credit of Municipal Corporation due to incomplete projects not moving forward )

प्रकल्पांची अंमलबजावणी व आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन संस्थेकडून रेटिंग दिले जाते. ए- प्लस प्लस, ए- प्लस, ए- मायनस, ए- ए- मानयस, बी- प्लस, बी- बी- मायनस, सी- सी- मायनस असे रेटिंगचे प्रकार आहेत. ए- प्लस, प्लस रेटिंग मिळाल्यास महापालिकेची बाजारातील पत सर्वोत्तम असल्याचे मानले जाते. त्याआधारे वित्त संस्था कर्ज देण्यासाठी पुढे येतात.

२०१४ मध्ये महापालिकेला प्रकल्प अंमलबजावणीचे ए- ए- मायनस व आर्थिक स्थितीचे ए- प्लस रेटिंग क्रिसिलकडून देण्यात आले होते. आर्थिक स्थितीचे रेटिंग चांगले असल्याने महापालिकेला सिंहस्थाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १९० कोटींचे कर्ज मिळाले होते. २०१८ मध्ये गरज नसलेली कामे रद्द करण्यात आल्याने तो निधी कर्ज परतफेडीसाठी वळविण्यात आल्याने महापालिका कर्ज मुक्त झाली होती. (latest marathi news)

NMC
Nashik NMC News : महापालिकेची पर्जन्ययागाची तयारी? जूनमध्ये पाऊस न पडल्यास चिंता

सुरू असलेले प्रकल्प, अंमलबजावणी, निधीची उपलब्धता, प्रकल्पांवरचा नियोजित व खर्च झालेला निधी याचा अभ्यास करून रेटिंग निश्‍चित केले. यात ए,ए मायनस असे मध्यम स्वरूपाचे कार्पोरेट रेटिंग महापालिकेला २०२३ मध्ये देण्यात आले होते. २०२४ मध्ये रेटिंग घसरले नसले तरी तरी ए- प्लस रेटिंग महापालिकेला प्राप्त करता आले नाही.

अर्थसंकल्पाचा आकडा वाढेना

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून महापालिकेने प्रकल्प हाती घेतले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात क्लीन एअर प्रोग्रॉम (एन-कॅप) अंतर्गत दूषित हवा स्वच्छ करण्यासाठी प्रकल्प हाती घेतले आहेत. अमृत-१ योजनेंतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारणाचे प्रकल्प हाती घेतले आहे. ते प्रकल्प अपूर्णावस्थेत आहे.

त्याचप्रमाणे दोन वर्षांपासून अर्थसंकल्पाचा आकडा वाढत नाही. त्याचबरोबर शहराची लोकसंख्या वाढतं असली तरी अपुरा कर्मचारी वर्ग व त्यामुळे कामाचा ताण वाढतं आहे. मालमत्ता कराची वसुली होत असली तरी थकबाकी मात्र जैसे-थे आहे. पाणीपट्टी शंभर टक्के वसुल होत नाही. ही प्रमुख कारणे रेटिंग न वाढण्यामागची आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

NMC
Nashik NMC News : महापालिकेपेक्षा शासनाकडे तक्रारींचा ओघ; 27 जूनपर्यंत निपटारा करण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.