Nashik Fraud : कामे न करताच लाटले 12 लाख! आड बु. येथील सरपंच, ग्रामसेविकेने संगनमताने लाटला वित्त आयोगाचा निधी

Latest Crime News : याप्रकरणी दोघांना पंचायत समितीने केवळ नोटीसा बजावल्या आहेत. समितीने काढलेल्या निष्कर्षानुसार तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते असा सूर येथे व्यक्त होत आहे.
Money Fraud Crime
Money Fraud Crimeesakal
Updated on

पेठ : आड बु. (ता. पेठ) येथील ग्रामसेविका आणि सरपंचांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करीत विकास कामे न करता केवळ कागदावर विकास दाखविला आहे असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. दोघांनी संगनमताने सुमारे बारा लाखांचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान याप्रकरणी दोघांना पंचायत समितीने केवळ नोटीसा बजावल्या आहेत. समितीने काढलेल्या निष्कर्षानुसार तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते असा सूर येथे व्यक्त होत आहे. (Nashik Crime 12 lakhs condsumed without doing any work Aad budruk)

आड बु. येथे पंधराव्या वित्त आयोगातील अपहारप्रकरणी पंचायत समितीच्या चौकशी समितीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ग्रामपंचायत कार्येक्षेत्रात वित्त आयोगाच्या निधीतून एकही काम झालेले नसून कामापोटी ग्रामसेवक व सरपंचांनी संगनमताने सुमारे अकरा लाख ६८ हजार ४८ रुपये विविध कामांवर खर्च केल्याचे दाखविले गेले आहे.

ग्रामसेवक श्रीमती बी. बी. गांगोडे यांनी कामाचे अंदाजपत्रके, मूल्यांकने नमुना क्रमांक १२, १५ आणि २२, मासिक सभा, ग्रामसभा येथील दप्तर चौकशीसाठी उपलब्ध करून दिले नाही, त्यामुळे या कालावधीत मासिकसभा अथवा ग्रामसभा झाल्याचे सिद्ध होत नसल्याने तसेच आड बु. येथील सार्वजनिक मुतारी, शौचालय, शाळा, शौचालय, स्टँड पोस्ट, सार्वजनिक विहीर परिसर तारकंपाऊंड, संरक्षक जाळी, इंधन विहिर हौद बांधणे, मेडिक्लोर खरेदी, डस्टबिन खरेदी, अंगणवाडीतील मुलांना गणवेश, ग्रामस्थांचा अभ्यास दौरा आदी कामे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेवर कधीही घेतलेली नाहीत. या कामासाठी केलेला सर्व खर्च ग्रामपंचायत सदस्यांना माहीत नाही, उपसरपंच व सदस्यांची मंजुरी किंवा सहमती घेतलेली नाही असे तक्रारदारांनी त्यांचे जबाबात समितीसमोर नमूद केले आहे.

सार्वजनिक विहिरीला कोबा करणे ६५ हजार, नवीन मोटार खरेदी पन्नास हजार, हातपंप मोटार दुरुस्ती ५५ हजार, वैयक्तिक नळ कनेक्शन १ लाख ७१ हजार, जिल्हा परिषद शाळा नळकनेक्शन ६ हजार ७७४, विंधन विहीर ७२ हजार, सार्वजनिक विहिर परिसर तार कंपाऊंड ७५ हजार, सार्वजनिक विहिर १ लाख २९ हजार, सार्वजनिक विहीर खोलीकरण ५० हजार, मेडीक्लोर खरेदी १५ हजार, डस्टबीन खरेदी २५ हजार, अंगणवाडीतील मुलांना गणवेश वीस हजार, हॅन्ड वाश स्टॅन्ड २२१३, पेव्हर ब्लॅक बसविणे पन्नास हजार, शेतकरी अभ्यास दौरा २५ हजार ३३६, कचराकुंडी पस्तीस हजार असा सुमारे ११ लाख ६७ हजार ४८ रुपयांचा अपहार झाला आहे. (latest marathi news)

Money Fraud Crime
Abu Salem Case : सालेमच्या मैत्रिणीसह दोघांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

बांधकाम विभागातील ३ लाख ४९ हजार २५, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ६ लाख ७३ हजार ७७४ व पंधराव्या वित्त आयोगातील निधी अंतर्गत १ लाख ४५ हजार २४९ रूपयांचा अपहारास ग्रामसेविका व सरपंच हे दोघे प्रशासकिय व आर्थिक अनियमिततसाठी समप्रमाणात जबाबदार असल्याचा चौकशी अहवाल चौकशी समितीने गटविकास अधिकारी यांना दिला असुन १५ व्या वित्त आयोग निधी कामातील अनियमितता बाबत सरपंच घनश्याम रामदास महाले व ग्रामसेविका श्रीमती भारती भास्कर गांगोडे यांना गटविकास अधिकारींनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान या भ्रष्टाचाराप्रकरणी सरपंच व ग्रामसेविका यांच्यावर कोणती कारवाई होईल याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे.

"आड बु. ग्रामपंचायतीतील पंधराव्या वित्त आयोगातील भ्रष्टाचाराच्या प्राप्त तक्रारीवरून पंचायत समितीच्या चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आली आहे. त्यानंतर कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्याकडे प्रस्ताव पाठविला जाईल."- जगन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी, पेठ.

Money Fraud Crime
Baba Siddique Murder : जेव्हा सलमानने केलेली बाबा सिद्दीकी यांची आमदार बनण्यात मदत ; मोदींसोबतचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.