Nashik Crime News : खैर तस्करीमध्ये गुजरातचे 15 जण; संशयित लोहारच्या वन कोठडीत वाढ

Crime News : या तस्करीमध्ये गुजरात कनेक्शन उघड झाले असून या प्रकरणातील २५ संशयितांपैकी १५ संशयित हे गुजरातमधील असल्याचे पुढे आले आहे.
Khair wood smuggling
Khair wood smugglingesakal
Updated on

Nashik Crime News : महाराष्ट्र गुजरात सीमेवर खैरची तस्करी करणारा मुख्य संशयित नवसू लोहार याला अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहे. या तस्करीमध्ये गुजरात कनेक्शन उघड झाले असून या प्रकरणातील २५ संशयितांपैकी १५ संशयित हे गुजरातमधील असल्याचे पुढे आले आहे. यातच संशयित लोहारा ऊर्फ खैर तस्कर पुष्पा याच्या वनकोठडीत वाढ करण्यात आली आहे. (Nashik Crime 15 people from Gujarat in Khair smuggling)

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर अनेक वर्षापासून खैराची तस्करी करणाऱ्या नवसू लोहार यास वनविभागाच्या पथकाने शिताफीने अटक केली. नवसू याची ओळख ही पुष्पा म्हणूनच सर्वत्र होती. तस्करीतील अनेक दाखल गुन्ह्यांमध्ये नवसू हा संशयित होता. अनेक वर्षापासून वनविभागाचे अधिकारी त्याच्या मागावर होते. २१ जून रोजी त्यास वनविभागाने अटक केली

वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या तपासामध्ये संशयित लोहार याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. त्याच्या अटकेमुळे खैर तस्कर प्रकरणी तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणातील एकूण २५ संशयीतांपैकी १५ गुजरात मधील असल्यामुळे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया व त्यांचे पथक आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुजरातमध्ये तळ ठोकून आहे. (latest marathi news)

Khair wood smuggling
Bhiwandi Crime: मदरशातील ११ वर्षीय मुलावर तरुणाने केले अनैसर्गिक अत्याचार!

संशयीतांना सीआरपीसी अंतर्गत कलम ४१ (अ) प्रमाणे नोटीस देऊन गुन्हे चौकशी कामात हजर राहण्याची नोटीस दिली आहे.त्यापैकी फक्त एक संशयित आरोपी यांनी पेठ येथे येऊन त्याचा जबाब नोंदवला आहे इतर कुठलेही आरोपी गुन्हे कामात चौकशीसाठी हजर झाले नाहीत. जे हजर झाले नाही त्यांच्या घरी वनविभागाने तपासणी केली त्यादरम्यान वृक्षतोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी वन विभाग व वन विकास यांची संयुक्त चौकशी सुरू असून वनविकास महामंडळाचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक वाय.एस.केसकर व पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग,विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Khair wood smuggling
Nagpur Crime : चिमुकलीच्या जन्मदिनीच वडिलाचा गळा चिरून खून; मेहंदी-बखारी रस्त्यावरील घटना; 2 अटकेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.