Nashik Crime : पुण्यावरून ऑनलाईन बुक केलेली कार भारतनगर चौकात आली. कारमधील संशयित महिला कारचालकास हॉल्टींग चार्जचे आमिष दाखवून निघून गेली. परंतु मुंबई नाका पोलिसांनी थांबलेल्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल ४ लाखांचा १९.३७ किलो गांजा आढळून आला आहे.
याप्रकरणी संशयित कारचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित महिलेसोबत असलेल्या बॅगेसह गोणींमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहानिशा न केल्याने अन् हॉल्टींग चार्जच्या आमिषाला बळी पडल्याने कारचालक मात्र अडकला गेला आहे. (19 kg of ganja caught in Bharatnagar Chowk)
किरण गोविंद धुमाळ (३२, रा. पुणे) अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय म्हैसधुणे, भास्कर सदगीर यांना भारतनगर चौफुलीवर इर्टिका कार सोमवारी (ता.८) सकाळी बराच वेळेपासून उभी असल्याची खबर मिळाली होती. त्यांनी गुन्हेशोध पथकाला माहिती दिल्यानंतर पथकासह मुंबई नाका पोलिसांनी इर्टिका कारची (एमएच १२ डब्ल्युआर ५२६२) झडती घेतली असता, कारमध्ये बॅगा आणि गोण्या होत्या.
त्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजासदृश्य अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित कारचालक धुमाळ यास ताब्यात घेत अटक करण्यात आली. संशयित कार जप्त करीत १९.३७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. (latest marathi news)
संशयित महिला पसार
पोलीस तपासामध्ये, संशयित पूजा संजय मिसाळ नावाच्या महिलेने ऑनलाईन उबेरवरून कारचालक धुमाळ याची कार नाशिकला येण्यासाठी बुक केली होती. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ते भारतनगर चौफुलीवर पोहोचले. त्यावेळी संशयित महिला व तिच्या समवेत आणखी एक इसम यांनी कारचालकाला हॉल्टिंग चार्ज देण्याचे आमिष दाखवून थोड्यावेळात येतो म्हणून निघून गेले, असे समोर आले आहे. त्यावरून पोलीस संशयित महिलेचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.