Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीमध्ये पोलीस ठाणेनिहाय व शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून अवैध धंदे, जुगार अड्ड्यांविरोधात धडक कारवाई केली जात आहे. सातपूर हद्दीमध्ये दोन जुगार-मटके अड्ड्यांवर धाड टाकून ते उदध्वस्त केले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिसात जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Nashik Crime 2 Matka den destroyed in Satpur City police action Cases filed against gamblers marathi news)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे, जुगार अड्ड्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यांची पथके व शहर गुन्हेशाखांची पथके धडक कारवाई करीत आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सातपूरच्या कोळीवाड्यात मटका जुगार अड्डा सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने कोळीवाड्यातील भेळभत्त्याच्या बिल्डिंगच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी संशयित टाईम नावाचा मटका जुगार खेळताना मिळून आले. पथकाने संशयित सुहास मच्छिंद्र महाले (४०, रा. तळेनगर, रामवाडी), राजेंद्र अशोक गांगुर्डे (३२, रा. महालक्ष्मी चौक, महादेववाडी, सातपूर), मारुती लिंबाजी साबळे (६४, रा. श्रमिकनगर, सातपूर), मंगेश जगन्नाथ लाड (५२, रा. महादेववाडी, सातपूर), शरद कमलाकर पोटिंदे (३२, रा. महादेववाडी, सातपूर) या जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच, ८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर, सातपूर पोलिसांनी रतन वाईन शॉपजवळ असलेल्या बोळीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याठिकाणी संशयित कल्याण मटका, मिलन डे, श्रीदेवी, नाईट मिलन या नावाचा मटका जुगार खेळताना मिळून आले. राम सदाशिव सोनुने (२९, रा. कार्बन नाका, सातपूर), उत्तम पांडुरंग कामडी (३२, रा. प्रबुद्धनगर, सातपूर), मरिबा गोविंदा गायकवाड (३५, रा. अशोकनगर, सातपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेत, ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.