Nashik Fraud Crime: नजरचुकीने बँकखात्यावर एक कोटी दोघांनी लाटले! ऑनलाईन व्यवहाराने आले गोत्यात

Crime News : ऑनलाईन पैसे वर्ग करताना नजरचुकीने दुसऱ्याच्याच बँक खात्यावर जमा झाल्याचा प्रकार घडला.
Money Crime
Money Crimeesakal
Updated on

नाशिक : ऑनलाईन पैसे वर्ग करताना नजरचुकीने दुसऱ्याच्याच बँक खात्यावर जमा झाल्याचा प्रकार घडला. परंतु ज्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग झाले त्यांनी ती रक्कम आपली नसल्याचे ठाऊक असतानाही परस्पर वर्ग करून घेत १ कोटीच्या रकमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा (Fraud Crime) दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Online transaction fraud marathi news)

वरदकुमार रजनीकांत पटेल, श्वासत शहा (दोघे रा. सन व्ह्यु अपार्टमेंट, दिंडोरी रोड, पोकार कॉलनी, पंचवटी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सुशिलकुमार दुतीया कुजूर (रा. राजपूर, ता. सबडेगा, जि. सुंदरगड, ओडिसा) यांच्या फिर्यादीनुसार, कॉपराईट इन्फोटेक या संस्थेचे एचडीएफसी बँकेत खाते आहे.

गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सुंदरगड (ओडीसा) येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर ऑनलाईन पैसे वर्ग करायचे होते. परंतु नजरचुकीने खातेक्रमांक चुकला आणि ऑनलाईन वर्ग करण्यात आलेली एक कोटी रूपयांची रक्कम नाशिकच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगरमधील एचडीएफसी बँकेत दोघा संशयितांच्या खात्यावर वर्ग झाले. (Latest Marathi News)

Money Crime
Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

ही बाब सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाच्या निदर्शनास आली. यासंदर्भात कार्यालयाकडून गेल्या तीन महिन्यांपासून पैसे परत मिळण्यासाठी थत्तेनगर येथील बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र रक्कम परत न आल्याने सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी कुजूर यांनी नाशिक गाठले असून, बँकेत चौकशी केली.

त्यावेळी दोघा संशयितांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा झाली असून, संशयितांनी सदरची रक्कम आपली नाही, हे ठाऊक असतानाही १ कोटीची रक्कम त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यावर वर्ग करून त्या रक्कमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी कुजूर यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे या करीत आहेत.

Money Crime
Vedgaon Crime: कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या! वेडगाव येथील घटना; कारण गुलदस्त्यात, पती फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.