Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखांकडून शहर परिसरामध्ये अवैधरीत्या हत्यारे बाळगणाऱ्यांची धरपकड सुरू आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी २३ शस्त्रे जप्त करीत २४ संशयितांविरोधात आर्मॲक्ट अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या संशयितांविरोधात येत्या काही दिवसांत कठोर कारवाईचे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले आहेत. (nashik crime 24 suspects arrested for illegal weapons marathi news)
निवडणूक काळात गुन्हेगारांचा वावर वाढण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांकडून कडक धोरण अवलंबिले आहे. शहर गुन्हे शाखांची पथकांकडून चाकू, चॉपर, कोयते, गावठी कट्टे, तलवारी आदी हत्यारे बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. गेल्या आठवडाभरामध्ये सातत्याने कारवाई करीत पोलिसांनी २४ संशयितांकडून चॉपर, कोयते, गावठी कट्टे अशी २३ हत्यारे जप्त करीत गुन्हे दाखल केले आहेत.
सात दिवसांत अवैध शस्त्रांबाबत अंबड पोलिसांत पाच, तर इंदिरानगर व आडगावच्या हद्दीत प्रत्येकी तीन गुन्हे दाखल आहेत. यासह नाशिकरोड, पंचवटीच्या हद्दीत प्रत्येकी दोन, तसेच गंगापूर, सातपूर आणि उपनगरच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे.
- २४ संशयितांवर आर्म ॲक्टअन्वये गुन्हे
- संशयितांकडून २३ शस्त्रे हस्तगत
- यात, २ देशी कट्टे, ६ जिवंत काडतुसे
- २१ कोयते, चॉपर, तलवार, चाकू
- २४ पैकी ६ विधिसंघर्षित बालक
- एका तडीपाराकडून कोयता जप्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.