Nashik Crime : जेलरोड येथे हवेत गोळीबार; 3 दिवसांनी वाच्यता : एकाला अटक

Latest Crime News : जेलरोड परिसरातील मॉडेल कॉलनीतील जलकुंभ गार्डनजवळ एकाने रविवारी (ता. २२) रात्री हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : जेलरोड परिसरातील मॉडेल कॉलनीतील जलकुंभ गार्डनजवळ एकाने रविवारी (ता. २२) रात्री हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसांनी या घटनेची वाच्यता झाल्याने परिसरातील नागरिकांसह नाशिकरोड पोलीसातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एका संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. ( 3 days after firing in air at Jail Road one arrested )

नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या सदस्यांमध्ये वाद होऊन सदरची घटना घडल्याचे समोर येते आहे. नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, संतोषचा मित्र भागवत, एक अनोळखी व्यक्ती अशी संशयितांची नावे असून, यातील नितीन बर्वे यास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग खंडेराव गुंजाळ (३२, रा. माणिकमोती सोसायटी, मॉडेल कॉलनी, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, मॉडेल कॉलनीत वसंतविहार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी गुंजाळ यांची निवड झाली आहे.

रविवारी (ता २२) रात्री दहाच्या सुमारास गुंजाळ हे मॉडेल काॅलनीतील गार्डनजवळ असतांना, त्यांना नितीन बर्वे याचा फोन केला. नवरात्राेत्सवाची तयारी करत असून सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. कुणीच धावपळ करत नसल्याचे गुंजाळ यांनी बर्वेला सांगितले. त्यावेळी बर्वेने आम्ही वर्गणीसाठी संतोष पिल्लेकडे आल्याचे सांगत चांगली वर्गणी देणार असल्याचे सांगितले.

Crime
Nashik Crime : हॉस्टेल रेक्टरविरोधात गुन्हा दाखल; आत्महत्त्येचे गुढ कायम

मात्र, गुंजाळ याने ‘तुम्ही मग फिरत बसा, संतोष पिल्ले गेला उडत, मला नाही करायची नवरात्र, अध्यक्षपदही नको असे म्हटल्याने रात्री ११च्या सुमारास मद्याच्या नशेतील चौघे संशयित कारमधून मॉडेल कॉलनीत पोहोचले. गुंजाळची भेट घेऊन कारमध्ये बसण्यास सांगितले. मात्र, गुंजाळने नकार देत घर गाठले. यानंतर संशयित पिल्ले याने हवेत गोळीबार केला. या घटनेने घाबरून गेलेल्या गुंजाळ यांनी बुधवारी (ता. २५) नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. या नंतर झालेल्या गोळीबाराची वाच्यता झाली.

चर्चा मात्र एअरगनची

दरम्यान, गोळीबार प्रकरणाची परिसरात उलटसुलट चर्चा आहे. गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची जशी चर्चा आहे, तशीच एअरगनमधून हवेत गोळीबार केल्याचीही चर्चा परिसरात आहे. परंतु अद्याप गोळीबार करणारा संशयित संतोष पिल्ले पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या चौकशीनंतरच गोळीबार गावठी कट्टा की एअरगनमधून हे निष्पन्न होऊ शकणार आहे.

Crime
Nashik Crime : टोळक्याचा पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.