Nashik Crime News : नाशिकरोड परिसरात एकच दिवशी 3 घरफोड्या; चोरट्यांनी लांबविला सुमारे 5 लाखांचा ऐवज

Nashik Crime : नाशिकरोड परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरफोड्या करीत सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : नाशिकरोड परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी तीन घरफोड्या करीत सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला आहे. यातील दोन घरफोड्या या भरदिवसा झाल्याने पोलिस गस्ती काय कामाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गंगापाडळी येथे बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५५ हजारांचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली. ( 3 house burglaries in Nashik Road area )

विठाबाई बाजीराव वलवे (रा. गंगापाडळी, ता. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.२३) सकाळी साडेअकरा ते सायंकाळी ७ या वेळेत अज्ञात संशयिताने बंद घराचे कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा २ लाख ५५ हजारांची ऐवज चोरून नेत घरफोडी केली. तर, चाडेगाव फाटा येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने १ लाख १२ हजार ३०० रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेत घरफोडी केली.

शांताराम विष्णू मानकर (रा. चाडेगाव फाटा, सामनगाव) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत त्यांच्या बंद घराची घरफोडी झाली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करीत आहेत. तसेच, चेहडी पंपींग येथील विजयनगरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २१ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली.

Crime
Nashik Crime News : गोवंशीयांची कत्तल करणारी टोळी जेरबंद! गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी

विजय बाबुराव भामरे (रा. कौशल्य निवास, विजयनगर, चेहडी पंपींग) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सदरची घरफोडी करीत घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक शिंदे हे तपास करीत आहेत.

पोलिस गस्त नाकाम

पोलिस ठाणेनिहाय दिवस-रात्र पोलिस गस्त केली जाते, असा पोलिसांचा दावा असतो. परंतु असे असतानाही, नाशिकरोड परिसरात भरदिवसा घरफोडीच्या दोन घटनांनी पोलिसांच्या गस्त नाकाम असल्याचेच अधोरेखित झाले आहे. पोलिस दलात गस्तीसाठी नवीन वाहने आली आहे. निवडणुकीचा बंदोबस्तही संपला असून, ताणही हलका झाला आहे. तरीही पोलिस हद्दीत पोलिसांकडून गस्त होत नसल्यानेच चोरट्यांनी घरफोडीची संधी मिळत असल्याचे बोलले जात आहे.

Crime
Nashik Crime News : वाहन जाळपोळीच्या घटनेतील 5 जणांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.