Nashik Crime News : म्हसरूळला 3 हजार किलो चंदनाचे लाकूड जप्त! मुख्य वनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाड मात्र गायबच

Latest Crime News : शासकीय यंत्रणेने ठरवले, की काहीही करू शकते. याची प्रचिती पुन्हा एकदा या कारवाईच्या निमित्ताने आली.
Stock of Sandalwood seized by Forest Department
Stock of Sandalwood seized by Forest Departmentesakal
Updated on

Nashik Crime News : वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या बंगल्यामधून चंदनाच्या झाडांची चोरीची घटना घडली होती. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करून झाडाझडती घेतली.

त्यानंतर खडबडून संपूर्ण वन विभागाने म्हसरूळ येथे एका घरावर धाड टाकून तब्बल तीन हजार किलो चंदनाचे लाकूड जप्त केले. मोठी कारवाई होऊनही चौकशीअंती मुख्य वनसंरक्षकाच्या बंगल्यात चोरी झालेले चंदनाचे लाकूड जप्त केलेल्या मुद्देमालात आढळून आले नाही. (3 thousand kg of sandal wood seized from Mhasrul)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.