Nashik Food Adulteration Crime : सिन्नरला 314 किलो भेसळयुक्त पनीर जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Food Adulteration Crime : मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत ३१४ किलो भेसळयुक्त पनीर नष्ट केले.
Nashik Food Adulteration
Nashik Food Adulterationesakal
Updated on

Nashik Food Adulteration Crime : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत ३१४ किलो भेसळयुक्त पनीर नष्ट केले. त्यामुळे तालुक्यात तयार होत असलेल्या पनीर निर्मितीवर शंका उपस्थित केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए), नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्‍यांना सिन्नरमध्ये भेसळयुक्त पनीर तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. (314 kg adulterated paneer seized from Sinnar)

गुरुवारी (ता.११) पथकातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून सिन्नर एमआयडीसी येथे सायंकाळी दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या यशवी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स, प्लॉट नंबर सी-८२, स्टाईस, मुसळगाव एमआयडीसी, येथे छापा टाकला. पथकातील अधिकाऱ्यांनी याठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनविताना रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळून आले.

Nashik Food Adulteration
Milk Adulteration Crime : दूध भेसळीविरोधात 7 खटले दाखल; जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून धडक मोहिम

श्रीमती. महाजन यांनी घटनास्थळी ५३ हजार ३८० रुपयांचा ३१४ किलो उत्पादित पनीरचा साठा जप्त केला. पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाइंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेत मुद्देमाल जप्त केला. संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनास जावू नये, याकरीता नष्ट करण्यात आले. याप्रकरणी नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून, अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कार्यालयामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे.

‘एफडीए’चे आवाहन

भेसळयुक्त पदार्थाच्या विक्रीबाबत माहिती असल्यास कार्यालयास लेखी तक्रारीद्वारे कळविण्यात यावे किंवा foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयातील अधिकाऱ्‍यांनी केले.

Nashik Food Adulteration
Nashik Food Adulteration Crime: शहरात पनीरचा भेसळयुक्त साठा जप्त, 2 ठिकाणी छापे; ‘एफडीए’ची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()