Nashik Crime News : घरफोडीतील 4 संशयित जेरबंद; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Nashik Crime : नाशिक शहरासह ग्रामीण भागात घरफोडीसह चोरी करणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी निफाड तालुक्यातून सापळा रचून शिताफीने जेरबंद केले आहे.
Four suspects and police officers, staff with stolen items.
Four suspects and police officers, staff with stolen items.esakal
Updated on

Nashik Crime News : नाशिक शहरासह ग्रामीण भागात घरफोडीसह चोरी करणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी निफाड तालुक्यातून सापळा रचून शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २ चारचाकी, ४ दुचाकी, २० तोळे सोने चांदीचे दागिणे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सुरू आहे. (4 burglary suspects jailed Performance of Adgaon Crime Investigation Team)

शिवाजी ऊर्फ शिवा सदाशिव मालखेडे (वय २१,) महेश सदाशिव मालखेडे (वय १९, दोघे रा. जऊळके फाटा, ता. दिंडोरी), संजय छोटू पहाडे (वय १९, रा. मोरे मळा, पंचवटी) व श्रावण पोपट भालेराव (वय २३, रा. जनार्दन नगर, नांदूर नाका) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

आडगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जऊळके फाटा व निफाड येथून वरील चारही संशयितांना अटक केली. तपासात त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. (latest marathi news)

Four suspects and police officers, staff with stolen items.
Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटी ८३ लाखांचा चरस जप्त

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चारचाकी, चार दुचाकी यासह सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण २३ लाख ४० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक जाधव, हवालदार सुरेश नरवडे, नीलेश काटकर, दादासाहेब वाघ, अंमलदार सचिन बाहिकर, हवालदार देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे, इरफान शेख यांच्या पथकाने केली.

Four suspects and police officers, staff with stolen items.
Crime News: दागिन्यांवर डल्‍ला मारणाऱ्या 'त्या' महिलेला पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.