सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. वावी पोलीस ठाणे अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून संघटित गुन्हेगारी कारवायांमुळे रेकॉर्डवर आलेल्या पाच जणांच्या विरोधात हद्दपारची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. हे सर्व गुन्हेगार सिन्नर तालुक्यातील असून त्यांना पुढील एक वर्षासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. (5 criminals deported from Nashik and Ahmednagar district )