Nashik Crime : तडीपारीनंतरही सव्वाशे गुंड शहरातच; पोलिसांचे आदेश पायदळी

Nashik : शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुंडांसह टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत दोन आठवड्यांसाठी तडीपारीची कारवाई केली.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद या सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुंडांसह टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत दोन आठवड्यांसाठी तडीपारीची कारवाई केली. परंतु तडीपार करण्यात आलेल्यापैकी सव्वाशे गुंडांनी या आदेशाला पायदळी तुडवित शहरात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करीत कारवाईचा बडगा उगारला आहे. (700 goons in city even after deported by police)

शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच किमान सहा ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपारीचे आदेश संबंधित पोलिस उपायुक्तांनी बजावलेले होते. तर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीतील दोन्ही परिमंडळांना सणउत्सवाच्या काळात उपद्रवी ठरू शकणारे, गुन्हे दाखल असलेल्या टवाळखोरांवरही ७ ते १९ तारखेदरम्यान, दोन आठवड्यांसाठी तडीपारीचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्या आदेशानुसार, परिमंडळ एकमधून १६७ तर, परिमंडळ दोनमधून १९४ असे एकूण ३६१ गुंडांची तडीपार करण्यात आली होती.

असे असले तरी, पोलीसांनी उत्सवाच्या काळात आयुक्तालय हद्दीत सराईत गुंडांची शोध मोहीम राबविली असता, या दोन आठवड्यांच्या काळात तडीपार केलेल्या ११० गुंड शहरात वास्तव्याला असल्याचे आढळून आले होते. तर, याशिवाय सहा महिने ते दोन वर्षे तडीपार केलेले १५ सराईत गुंडही या मोहिमेअंतर्गत पोलिसांच्या हाती लागले आहेत. यातून, १२५ तडीपार गुंडांनी शहर आयुक्तालयाच्या तडीपारीच्या आदेशालाच पायदळी तुडविले असून, याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस ठाणेनिहाय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Crime
Nashik News : आदिवासी भागातील मजुरांवरच कसमादेकरांची भिस्त! कांदा लागवड, बाजरी, भुईमूग, उडीद काढणी जोरात

गणेशोत्सवातील तडीपार : ३६१

शहरातच वास्तव : ११०

पोलिस ठाणेनिहाय मिळून आलेले तडीपार

पंचवटी : १९

भद्रकाली : १६

इंदिरानगर : १५

नाशिकरोड : ११

मुंबईनाका : १०

अंबड : १०

सातपूर : ८

उपनगर : ६

आडगाव : ६

सरकारवाडा : ३

देवळाली कॅम्प : २

म्हसरुळ : २

गंगापूर : २

एकूण : ११०

मिळून आलेले सराईत तडीपार

भद्रकाली : ४

मुंबईनाका : ४

अंबड : २

सरकारवाडा : २

सातपूर : १

इंदिरानगर : १

गंगापूर : १

एकूण : १५

Crime
Nashik Crime News : ट्रॅक्टरचे आमिष दाखवून कोल्हेरच्या शेतकऱ्याला गंडा! तोतया संदीप अवधूतविरोधात वणी पोलिसांत गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.