Nashik Crime News : पंचवटीत 6 महिन्यांत 8 खून!

Nashik News : नाशिक शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. एकट्या पंचवटी विभागातील तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १ जानेवारी ते १७ जून या साडे पाच महिन्यांत तब्बल आठ खून झाले.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : नाशिक शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. एकट्या पंचवटी विभागातील तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १ जानेवारी ते १७ जून या साडे पाच महिन्यांत तब्बल आठ खून झाले. साधारण सरासरी २० दिवसाला १ खून या गतीने वाढणाऱ्या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांच्या हातात शस्त्र देउन त्यांच्या मार्फत काटा काढण्याची मोडस आॅपरेंडी मात्र चिंताजनक आहे. पोलिसांसमोर तेच मोठे आव्हान आहे. (Crime 8 murders in Panchavati in 6 months)

शहर झपाट्याने विकसित होत असताना शहराचा एक भाग असलेल्या पंचवटीत लोकवस्ती वाढत आहे. श्रीरांमाच्या मंदीराचा परिसर म्हणून देशभर धार्मीक महत्व असलेल्या रामाच्या पंचवटीत पर्यटकांची संख्या मोठी असल्याने त्यांना त्रास देण्यासह विधी संघर्षित बालकांचा वापर करुन घेण्याची गुन्हेगारीची पध्दत भविष्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याचा धोका आहे.

बालकांचे गुन्‍हेगारीकरण

पंचवटीत झोपडपट्टीचा भाग सर्वाधिक आहे. फुलेनगर, नवनाथ नगर, वज्रेश्वरी नगर, मायको दवाखाना, तेलंगवाडी, राहुलवाडी, अवधूतवाडी, एरंडवाडी, भराडवस्ती, डावा तट कालव्या लगत असलेली झोपडपट्टी, वाघाडी, संजयनगर, गणेशवाडी, शेरे मळा, कोळीवाडा अशा विविध भागात गुन्हेगारीचा वेग बघता, हा परिसर कायदा सुव्यवस्थेसाठी कायमच आव्हानात्मक राहिला आहे.

पोलिसांनी सगळे संशयित जेरबंद करुन कारागृहात पाठविले आहे. मात्र सध्या या भागात अल्पवयीन मुलांच्या हाती शस्त्र देउन ज्या पध्दतीने गुन्हेगारी वाढविली जात आहे. ती मोडस आॅपरेंडी धोकादायक आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत आणणाऱ्या पडद्याआडच्या सूत्रांपर्यत पोलिस यंत्रणा पोहोचली पाहिजे. (latest marathi news)

Nashik Crime News
Jalgaon Crime: मानसिक त्रासाला कंटाळून मुलानं उचललं टोकाचं पाऊल! संशयितांना पोलिस कोठडी! घुमावल बुद्रूक येथील घटनेतील तिघांना अटक

पंचवटी कार्यक्षेत्रात ५ खून

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच खून झाले. यात एक खून हा प्रियकराने मैत्रिणीचा गळा आवळून, दोन खून सराईत गुन्हेगारांचे झाले आहेत. एक फिरस्त्याचा किरकोळ वादातून, तर एक खून मित्रांनीच मागील भांडणाचा राग मनात ठेवून केला आहे. सर्व खूनातील संशयित जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांना यश मिळाले असून, सर्व संशयित कारागृहात आहेत.

आडगावात दोन खून

मुख्य शहरापासून दूर आडबाजूला असलेल्या आडगाव पोलिस ठाण्याची हद्दीत गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. तपोवन, आडगाव, नांदूर मानुर, माडसांगवी, लाखलगावसह विडी कामगारनगर, अमृतधाम, कोणार्कनगर, कैलासनगर, वसंतदादा नगर असे काही आव्हानात्मक बनत आहे. या भागात दोन खुनाच्या घटना घडल्या. ठेकेदार व कामगारातील वादातून एक खून तर एका विवाहितेने आपल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची दुसरी घटना घडली आहे.

Nashik Crime News
Nashik Crime News : शिवाजीनगरला टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

म्हसरूळला लागण

दोन्ही भागाच्या तुलनेत शांत म्हटल्या जाणाऱ्या म्हसरूळ, मखमलाबाद शिवारात गुन्हेगारी डोके वर काढू लागल्याचे संकेत आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकच खूनाचा प्रकार उघडकीस आला. मात्र त्या एकमेव खूनात रिक्षाचालकाचा ज्या पध्दतीने दगडाने ठेचून मारले गेले तो प्रकार गंभीर गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु केल्याचे ध्वनीत करणारा आहे. सर्व संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने बेड्यादेखील ठोकल्या.

"वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये विधी संघर्षित बालकांचा समावेश अधिक आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी आणि विधी संघर्षित बालकांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही समुपदेशन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर प्रभावीपणे कामदेखील सुरू झाले आहे. तसेच दुसऱ्या बाजूने काही दिवसांच्या अंतराने अशा संवेदनशील भागात 'ऑलआउट', 'कोंबिंग ऑपरेशन' राबवून सराईताची कसून तपासणी केली जात आहे." - मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी पोलिस ठाणे व गुन्हे शाखा युनिट

Nashik Crime News
Beed Crime : कुख्यात गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;दोन गुन्हे उघडकीस, सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.