Nashik Crime News : भुरळ घालून 8 तोळे दागिन्यांवर मारला डल्ला

Nashik Crime : देवघर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या व्यक्तीने भुरळ घालून गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन अंगठ्या घेत पोबारा केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
A credible incident captured on CCTV.
A credible incident captured on CCTV.esakal
Updated on

Nashik Crime News : येथील नगरपरिषद समोरील जाजू गल्लीत श्रद्धा फर्निचरमध्ये देवघर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या व्यक्तीने भुरळ घालून गळ्यातील सोन्याची चेन व हातातील दोन अंगठ्या घेत पोबारा केल्याची घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, रामेश्‍वर रामदयाल बांगड यांच्या फर्निचरच्या मॉलमध्ये दुपारी तीन वाजता तोंडाला मास्क लावत एक व्यक्ती आला. (Nashik Crime 8 tola jewellery were stolen after being lured marathi news)

याबाबत माहिती अशी की, रामेश्‍वर रामदयाल बांगड यांच्या फर्निचरच्या मॉलमध्ये दुपारी तीन वाजता तोंडाला मास्क लावत एक व्यक्ती आला. त्याने मंदिर घ्यायचे सांगत काऊंटरवर ठेवण्यास सांगितले. ठरलेले पैसे देत त्याने पैसे व तुमच्या हातातील अंगठ्या, गळ्यातील चेन काढून या पैशांमध्ये ठेवा, तुमच्या व्यवसायाला बरकत येईल. (latest marathi news)

A credible incident captured on CCTV.
Nashik Crime News : अखेर भद्रकाली पोलिसांना सापडला तडीपार कोकणी; आदेशाचे उल्‍लंघन केल्‍याने गुन्‍हा दाखल

त्यावर दुकानमालक बांगड यांनी आमच्या इथे भरपूर चोर येत असल्याचे सांगत नकार दिला. त्यावर त्याने मी त्यातला नव्हे. तुम्ही भरवसा ठेवा. त्याचे हे शब्द ऐकून मालक रामेश्‍वर बांगड यांनी चेन व अंगठी काढून त्याच्या हातात दिली. त्याने सर्व ऐवज एका पिशवीत टाकून पिशवी बांधून काऊंटरवर ठेवत पाच मिनिटानंतर उघडण्यास सांगून काढता पाय घेतला.

बांगड यांना संशय आल्याने त्यांनी पिशवी खोलून पाहिली असता त्यात नागलीचे पान, बिस्कीट व फुलवाती होत्या. त्यांनी दुकानाबाहेर जाऊन पाठलाग केला असता चोरट्याने पोबारा केला. याबाबत ओझर पोतलस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह बापू अहिरे तपास करीत आहे.

A credible incident captured on CCTV.
Nashik Crime News : कुकूडाणे येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून 10 लाख रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.