Nashik Crime News : अपघातप्रकरणी आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Crime News : जखमींच्या नुकसान भरपाईसाठी ५ हजार रुपये देण्याचेही आदेश बजावले आहेत.
Court Order
Court Orderesakal
Updated on

Nashik Crime News : हिरावाडी रोडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने पादचारी बापलेकांना धडक देत जखमी केले होते. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी दुचाकीस्वाराला सहा महिने सश्रम कारावास व ३ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच, जखमींच्या नुकसान भरपाईसाठी ५ हजार रुपये देण्याचेही आदेश बजावले आहेत. (Nashik Crime Accused rigorous imprisonment)

अभिजित संजय कपिले (२४,रा. हिरावाडी, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण नाना कुमावत (रा. लामखेडे मळा, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, सदरची घटना २२ मार्च २०१५ रोजी तारवालानगर-हिरवाडी रोडवर घडली होती. आरोपी कपिले याने दुचाकी (एमएच १५ सीक्यु ८७४९) भरधाव वेगात चालवून अपघात केला.

यात कुमावत व त्यांच्या मुलाच्या पायाचे हाड मोडले होते. आरोपी कपिले याच्याकडे वाहनपरवाना नव्हता, तसेच वाहनाचा विमाही नव्हता. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल होता. हवालदार ए.एम. सरोदे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. (Latest Marathi News)

Court Order
Kolhapur Crime : दोन दुर्घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू; करेकुंडीत निवृत्त जवानाचा दोन मुलींसह अंत

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.सी. नरवाडिया यांच्यासमोर खटला चालला. सरकारी अभियोक्ता श्रीमती पी.जे. घोडके यांनी साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात दोषसिद्‌ध झाल्याने न्यायालयाने त्यास शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

Court Order
Akola Crime News : जावई निघाला सासूचा खुनी; गुन्हा उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.