Nashik Crime News : वर्चस्व सिद्ध करण्याच्या संघर्षातून टोळीकडून अंबड परिसरात गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आठ संशयितांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोरख्या दर्शन दोंदेसमवेत टोळीतील इतर सराईतांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ५३ गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ()
गेल्या ७ एप्रिलला वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये अंबड परिसरात वाद उफाळून आला होता. वैभव शिर्के व दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून हा वाद निर्माण झाला होता. या वेळी कुरापत काढून दर्शन दोंदेने टोळीतील अन्य सराईतांसोबत वैभववर प्राणघातक हल्ला केला होता. या वेळी गावठी कट्ट्यातून वैभववर गोळी झाडत धारदार शस्त्राने वार करत जखमी केले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात सराईत दर्शनसमवेत त्याचे साथीदार या प्राणघातक हल्ल्यात सहभागी झाल्याचे उघड झाले. गणेश खांदवे (वय २८, रा. इंदिरानगर), राकेश गरुड (वय ३२, रा. उत्तमनगर), अथर्व राजधर ऊर्फ खग्या (वय २०, रा. पाथर्डी फाटा), अजय राऊत ऊर्फ बट (वय २७, रा. होलाराम कॉलनी), जितेंद्र चौधरी ऊर्फ छोट्या काळ्या (वय २६, रा. बंदावणेनगर), महेश पाटील ऊर्फ बाळा (वय २१, रा. रायगड चौक), अक्षय गावंजे (वय २४, रा. सावतानगर) या संशयितांचा यात समावेश होता.
या संशयितांनी संघटितपणे गुन्हे करताना शस्त्र बाळगून शहरातील अंबड, उपनगर, आडगाव, सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची जाळपोळ करणे, दंगा करणे, मारहाण करणे आदी वेगवेगळे ५३ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. यासोबतच इतरही सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा निर्णय पोलिस विभागाने घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.