Nashik Crime News : दागिने अपहारप्रकरणी आडगावकर, गोडसेंना अटक

Nashik Crime : दागिन्यांचा अपहार करून एक कोटी १७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी श्‍याम आडगावकर या सराफ व्यावसायिकासह शंकर गोडसे यांना अटक केली आहे.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : दागिन्यांचा अपहार करून एक कोटी १७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी श्‍याम आडगावकर या सराफ व्यावसायिकासह शंकर गोडसे यांना अटक केली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime arrested in jewelry embezzlement case marathi news)

पोलिसांच्या माहितीनुसार, गिरीश पोतदार (६०, रा.अश्विन नगर, सिडको) यांनी व त्यांच्या नातेवाइकांच्या सोने, चांदीच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा दावा फिर्यादीत केला आहे. त्यानुसार एक कोटी १७ लाख ८४ हजार रुपयांच्या अपहाराचा गुन्हा सहा संशयितांविरुद्ध नोंद आहे.

crime
Nashik Crime News : पाणीपुरी दिली नाही म्हणून लाकडी दांडक्याने केली मारहाण

त्यामध्ये श्याम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, शंकर पंडित गोडसे, मयूर शहाणे, राजेंद्र शहाणे या संशयितांचा समावेश आहे. त्यांपैकी संशयित श्याम आडगावकर आणि शंकर गोडसे यांना गुरुवारी (ता.२२) रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पगार अधिक तपास करत आहेत.

गुन्ह्याची व्याप्ती वाढणार

दागिन्यांच्या पैशातून मालमत्ता घेतल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. शहरातील दोन नामवंत सराफ व्यावसायिकांच्या कुटुंबावर पुन्हा गुन्हा नोंद झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस अधिक तपास करत आहेत.

crime
Nashik Crime News : बंदी असलेला गुटखा हेलिकॉप्टरने येतो का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.