Nashik Crime News : तीन तलाक देणाऱ्या पतीसह सासरच्‍या मंडळीविरोधात गुन्हा

Nashik Crime : फॅब्रिकेशनचे दुकान वाढविण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत शिवीगाळ व मारहाणीसह दमदाटी केल्‍याची फिर्याद पीडित महिलेने केली आहे.
crime
crime esakal
Updated on

Nashik Crime News : फॅब्रिकेशनचे दुकान वाढविण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत शिवीगाळ व मारहाणीसह दमदाटी केल्‍याची फिर्याद पीडित महिलेने केली आहे. स्‍त्रीधन स्‍वतःजवळ ठेवत मानसिक छळ करून तीन तलाक दिल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात पतीसह सासरकडील एकूण आठ जणांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. मुस्‍लीम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल हा पहिला गुन्‍हा असल्‍याचे बोलले जात आहे. (Nashik Crime against husband and father in law marathi news)

यासंदर्भात पीडितेने दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे, की सासरकडील मंडळींकडून पैशांसाठी सारखा तगादा लावला जात होता. दुकान वाढविण्यासाठी १० लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी केली जात होती. २६ नोव्‍हेंबर २०२२ पासून १ मार्च २०२४ या कालावधीत वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करताना स्‍त्रीधनही स्‍वतःजवळ ठेवले. (latest marathi news)

crime
Nashik Crime News : काजळे खुनप्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

तसेच ‘तलाक देता हु’ असे बोलून तीन तलाक दिला म्‍हणून फिर्याद दिल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यानुसार भारतीय दंडविधानातील कलमांसह मुस्‍लीम महिला विवाहाचे अधिकाराचे संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ४ प्रमाणे गुन्‍हा दाखल झाला आहे.

पती शाकीब कमरअली सय्यद, सासरे कमरअली सय्यद, सासू नफिसा सय्यद, नणंद शर्मील सय्यद, नंदोई शकील सय्यद, चुलत सासू शाजीया सय्यद, चुलत सासरा आरिफ सय्यद, आते सासरे सलीम शेख अशा आठ जणांविरोधात ही तक्रार दाखल केली असून संशयितांना अद्याप अटक केले नसल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

crime
Nashik Crime News : मातोरीच्या गुंडाला तडीपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.