नाशिक : पेठरोडवरील फुलेनगरमध्ये कालिका नगरात असलेल्या मतदान केंद्राच्या शाळेबाहेरच ढिकले व गिते समर्थक असलेल्या दोघांमध्ये फ्रि-स्टाईल मारामारी झाली. विशेषत: दोघेही संशयित हे एकमेकांचे साडू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दिंडोरी रोडवरील वज्रेश्वर नगर झोपडपट्टीत राडा झाला. दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील बहुतांशी मतदान केंद्रांना भेटी देत चोख बंदोबस्ताचा आढावा घेतला.