Nashik Crime News : अंगणवाडी सेविकेला मालेगावी मारहाण!

Nashik News : मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराळे या अंगणवाडी सेविकेवर येथील काही पुरुष आणि महिलांनी हल्ला केला. कुटुंबात चार मुली असल्याने योजनेचा लाभ बसत नाही, असे सांगितल्याने हा हल्ला करण्यात आला.
Khtyabai Borale
Khtyabai Boraleesakal
Updated on

Nashik News : लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकेवर दिली आहे. लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे गोळा करत असताना मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराळे (नरडाने आदिवासी वस्ती, ता. मालेगाव, पो. कलवाडी) या अंगणवाडी सेविकेवर येथील काही पुरुष आणि महिलांनी हल्ला केला. (Anganwadi worker beaten in malegaon)

कुटुंबात चार मुली असल्याने योजनेचा लाभ बसत नाही, असे सांगितल्याने हा हल्ला करण्यात आला. शासनाच्या ‘लाडकी बहीण योजने’ची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आलेली आहे. हेच काम मालेगाव येथील खट्याबाई कौतिक बोराळे करीत होत्या.

कुटुंबात चार मुली असल्याने संबंधित लाभार्थी नियमात बसत नाही, असे बोराळे यांनी सांगितले. त्यावर एक हजार ५०० रुपये आपल्या कुटुंबाला मिळणार नाही म्हणून लाभार्थ्यांनी थेट अंगणवाडी सेविका बोराळे यांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली. (latest marathi news)

Khtyabai Borale
Kej Crime News : घरावर पेट्रोल टाकून कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न; ढाकेफळ येथील मध्यरात्रीची घटना

संबंधित अंगणवाडी सेविका आता मालेगावी सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. या संदर्भात शासनाने अंगणवाडी सेविकांची सर्व जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी आयटकने केली आहे. या संदर्भात अंगणवाडी सेविका लवकरच आंदोलन करणार असल्याचे कॉ. राजू देसले यांनी सांगितले.

Khtyabai Borale
Pune Crime News: महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.