नाशिक : एकलहरे रोडवर सराईत गुन्हेगार चेतन ठमके याचा करण्यात आलेल्या खुनप्रकरणात (Murder Case) चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे. (Nashik Crime Thamke murder case marathi news)
अनिकेत उर्फ बच्चा सुरेश साठे (३०, रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या चौथ्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वीच संशयित प्रफुल्ल उर्फ सोनू विजय पाटील (२१, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड), पंकज विनोद आहेर (२५, रा. महाकाली चौक, सिडको, नाशिक), आशिष रामचंद्र भारद्वाज (२५, रा. शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको) या तिघांना अटक केली आहे.
एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीच्या भितीजवळील निर्जनस्थळी रविवारी (ता. १८) सराईत गुन्हेगार चेतन ठमके(रा. विजयनगर, सिडकाे) याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर समांतर तपास करताना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकने तिघांना अटक केली. (Latest Marathi News)
तपासातून मयताने मुख्य संशयित आहेर याच्या कौठुंबिक कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी ठमके याने आहेर यालाच गेम करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आहेर यानेच त्याच्या साथीदारांच्या मदतीने ठमके याचा खून केल्याचे समोर आले.
यातील तिघांना अटक केल्यानंतर चौकशीतून त्यांच्या चौथ्या साथीदार असल्याचेही समोर आले. त्यावरून मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पथकाला एकलहरा परिसरात चौथा संशयित अनिकेत उर्फ बच्चा सुरेश साठे हा एकलहरा ट्रॅक्शन येथे असल्याचे कळताच त्याला सापळा रचून अटक केली. त्यास तपासकामी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.