Nashik Crime News : भारतनगर वाहन तोडफोड प्रकरणातील संशयितांची धिंड

Nashik Crime : भारतनगर परिसरातील टवाळखोरांकडून दहशत पसरवित चार वाहनांची तोडफोड करण्याची घटना शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.
Mumbai Naka Police Officers and suspects of vehicle vandalism from Bharat Nagar area.
Mumbai Naka Police Officers and suspects of vehicle vandalism from Bharat Nagar area.esakal
Updated on

Nashik Crime News : भारतनगर परिसरातील टवाळखोरांकडून दहशत पसरवित चार वाहनांची तोडफोड करण्याची घटना शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अवघ्या काही तासांत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी (ता. २४) रात्री भारतनगर परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली.

काझीगढी भागात वाहनांची जाळपोळ करण्याची घटना ताजी असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. (Nashik Arrest of suspects in Bharat Nagar vandalism case)

घरांवर दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण भारतनगर पेटवून टाकू, येथील भाई असल्याचे ओरडत परिसरात दहशत निर्माण केली. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई नाका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, अंमलदार फरीद इनामदार, समीर शेख यांना संशयितांची माहिती मिळाली.

Mumbai Naka Police Officers and suspects of vehicle vandalism from Bharat Nagar area.
Mumbai Crime: वृद्धाने केला मुलीचा विनयभंग; रागाच्या भरात बापाकडून खून

वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गुन्हे साजिद मन्सुरी, रोहिदास सोनार, समीर शेख, फरीद इनामदार, आर. आर. टेमगर, श्री. नाकोडे अवघ्या काही तासांत संशयित अमन खालिद खान (वय १९, रा. भारतनगर), गुलाम रसूल मोहम्मद हसन अन्सारी (वय २७, रा. भारतनगर).

गौस मोहम्मद इब्राहिम शेख (वय १८, रा. भारतनगर), साहिल जावेद पठाण (वय २०, रा. भारतनगर), वाजिद अब्दुल वाहिद चौधरी (वय ३१, रा. नानावली), तौफिक रफिक शेख (वय २४, रा. शिवाजी चौक), रज्जाक हुसेन शेख (वय १८, रा. भारतनगर), अशा सात जणांना ताब्यात घेतले. नागरिकांमधील त्यांची भीती काढून टाकण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण भारतनगर परिसरातून त्यांची धिंड काढली. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Mumbai Naka Police Officers and suspects of vehicle vandalism from Bharat Nagar area.
Crime News: भावानेच केला भावावर हल्ला; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.