Nashik Crime : नाशिकरोड परिसरामध्ये दीड वर्षांपूर्वी वास्को चौकात दोघांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या संशयिताला शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिताफीने अटक केली आहे. संशयित शहरामध्येच नाव बदलून आणि ओळख लपवून वावरत होता. (Nashik Crime arrests innkeeper who changed his name in city)
सुशिल उर्फ गोरख रामभूल बेद (३७, रा. पार्क अव्हेन्यू, देवळाली कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिकरोड परिसरामध्ये रिक्षाचालक असलेला संजय जाधव हा पोलीस गाडी वा पोलीस अंमलदार दिसताच संशयास्पदरित्या पसार होत असल्याची खबर शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने या संजय जाधव याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध सुरू केला असता, गुरुवारी (ता. १३) तो देवळाली कॅम्प परिसरामध्ये आढळून आला. पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळीही त्याने स्वत:चे नाव संजय जाधव असेच सांगितले. परंतु त्याच्या चौकशीतून विसंगती दिसू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसी खाक्या दाखविताच, जाधव याने त्याचे खरे नाव सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद असल्याचे सांगितले. पथकाने शहरातील दाखल गुन्ह्यांची माहिती काढली असात, बेद याच्याविरोधात १९ जानेवारी २०२३ रोजी जीव ठार मारण्याचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. (latest marathi news)
बेद व त्याचे साथीदार शंकर चावरिया, शुभम चावरिया यांनी वास्को चौकात सोनसिंग शिकलकर, अनमोलसिंग शिकलकर यांच्यावर जुन्या भांडणांची कुरापत काढून तलवार व लोखंडी रॉडने मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तेव्हापासून तो फरार होता. संशयित बेद यास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, डी.के. पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांच्या पथकाने बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.