Nashik Crime : एटीएममध्ये फेरफार करणारी टोळी कार्यरत! पोलिसांकडे तक्रारी; बँकांना ATM संदर्भात पोलिसांकडून सूचना

Latest Crime News : यासंदर्भात शहर गुन्हे शाखेने शहरातील बँकांना एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेसंदर्भात सूचना केल्या आहेत. मात्र, संशयित टोळीमुळे अनेक एटीएम ग्राहकांना आर्थिक फटका बसला असून, यासंदर्भात अनेकांनी बँकांकडे तक्रारी केल्या आहेत.
atm crime
atm crimeesakal
Updated on

Nashik Crime : शहरातील बहुतांशी एटीएम केंद्रांच्या बाहेर सुरक्षारक्षक नसल्याचा गैरफायदा घेत एटीएममधून पैसे येणाऱ्या ठिकाणी फेरफार करून गंडा घालणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. यासंदर्भात शहर गुन्हे शाखेने शहरातील बँकांना एटीएम केंद्राच्या सुरक्षिततेसंदर्भात सूचना केल्या आहेत. मात्र, संशयित टोळीमुळे अनेक एटीएम ग्राहकांना आर्थिक फटका बसला असून, यासंदर्भात अनेकांनी बँकांकडे तक्रारी केल्या आहेत. (ATM tampering gang working)

मुंबई नाका हद्दीतील नाशिक मर्चंट बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे बाहेर येण्याच्या ठिकाणी फेरफार करीत चिकटपट्टी वापरून ६ हजार ८०० रुपये काढून घेतल्याचा प्रकार सप्टेंबरमध्ये घडला आहे. नसरीन इम्तियाज काझी (रा. पखाल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिक मर्चंट बँकेचे एटीएम सम्राट न्युक्लियस इमारतीमध्ये आहे.

याठिकाणी त्या पैसे काढण्यासाठी गेल्या असता, प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एटीएममधून पैसे बाहेर आले नाहीत. मात्र त्यांना पैसे मिळाल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी बँकेकडे तक्रार केली असता, त्यांच्या तपासणीतही पैसे मिळाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, अशा स्वरूपाच्या घटना शहर परिसरात घडल्या. गणेश कांबळे हे उंटवाडी परिसरातील एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना हा अनुभव आला. यासंदर्भात त्यांनी बँक आणि मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार केली आहे. मुंबई नाका पोलिसांनी काही एटीएम केंद्रांची तपासणी केली असता, त्याठिकाणी फेरफार केल्याचे आढळले आहे.

अशी आहे मोडस्‌

संशयित एटीएममध्ये ग्राहक येण्यापूर्वी एटीएमच्या ज्या फ्लीपमधून पैसे बाहेर येतात, त्या जागेवर संशयित बनावट फ्लीपची चिकटपट्टी लावतात. सहसा ती कोणाच्या लक्षात येणार नाही. परंतु बारकाईने पाहिल्यास ती लक्षात येऊ शकते.

ग्राहकाने प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पैसे बाहेर पडण्याऐवजी बनावट फ्लीपच्या चिकटपट्टीला अडकतात. ग्राहकाला पैसे मिळाल्याचा मेसेज प्राप्त होतो पण, पैसे हातात येत नाहीत. त्यानंतर ग्राहक एटीएम केंद्राच्या बाहेर पडताच, संशयित एटीएममध्ये जाऊन चिकटपट्टीमधील पैसे काढून पसार होतात. (latest marathi news)

atm crime
Hingoli Crime : व्यावसायिक अपहरणप्रकरणी सहा जणांना अटक; आरोपींना मोक्का लावणार एसपी कोकाटेंची माहिती

बँकेने हात झटकले

दरम्यान, एका ग्राहकाने बँकेकडे तक्रार करताना एटीएम केंद्रांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची आग्रही मागणी केली. त्यावेळी संबंधित बँकेने एटीएमच्या सुरक्षिततेची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिली असून बँकेचा त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगत हात झटकले. परंतु ग्राहकाच्या गेलेल्या पैशांचे काय, असा सवाल उपस्थित केला असता, तक्रारीनुसार तपास करून पैसे परत मिळतील, असे आश्वासन दिले.

"उंटवाडी येथील एटीएममध्ये फेरफार करून संशयित पैसे काढतात. याचा ग्राहकांना नाहक भुर्दंड बसतो आहे. यासंदर्भात पोलिस आणि बँकेकडे तक्रार केली आहे. पोलिसांनीही बँकांना सुरक्षिततेसंदर्भातील सूचना केल्या आहेत."- गणेश कांबळे, ग्राहक

"एटीएममध्ये बनावटरितीने फेरबदल करून पैसे लाटणारी टोळी शहरात सक्रिय आहे. या टोळीचा पोलिस शोध घेत आहेत. बँकांकडेही यासंदर्भात तपशीलवार चौकशी केली जात आहे.

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

atm crime
Nashik Crime : मालेगावात NIA-ATSची छापेमारी! तिघे ताब्यात; जैश- ए- मोहम्मदला फंडिंग केल्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.