Nashik Crime News : लखमापूरहून एटीएम पळविणारे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Nashik Crime : चोरलेले एटीएम गाडीत घालून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
Crime
Crimeesakal
Updated on

Nashik Crime News : येथून एटीएम गॅस कटरने तोडून संपूर्ण एटीएम मशीनच चोरून नेल्याची घटना घडली होती. हे चोरलेले एटीएम गाडीत घालून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. हे चोरटे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांनी दिली आहे. ( ATM thieves from Lakhmapur got caught in police)

गुरुवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून सटाणा पोलिसात अजमेर सौंदाणे येथील प्रफुल्ल केदा पवार यांनी इंडिया वन एटीएम चोरीची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर पहाटे एक ते सातच्या दरम्यान लखमापूर येथील बसस्थानकाजवळील सचिन बच्छाव यांच्या खासगी जागेत असलेले एटीएम मशीन चोरून नेले. या एटीएममध्ये १ लाख ७५ हजार ८०० रुपये एवढी रक्कम होती.

या रकमेसह संपूर्ण एटीएम मशीन चोरून नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सटाणा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच वैजापूर येथील तलवाडा परिसरात हेच एटीएम गाडीतून पळवून नेणाऱ्या दोघांना स्थानिक शेतकऱ्यांनी शिताफीने पकडले आणि पोलिस येईपर्यंत बांधून ठेवल्याचे पुढे आले. विष्णू रामभाऊ आकात (२९, रा. सतोना, ता. परतूर, जि. जालना) व देवा सुभाष तावडे (२०, रा. पुंडलिकनगर, जालना) असे या दोघा संशयितांची नावे आहेत.

Crime
Nashik Crime News : गांजा प्रकरणातील संशयित महिला सापडेना; कारचालकाला पोलिस कोठडी

त्यांचा एक सहकारी फरार झाला आहे. हे चोरटे सकाळी लघुशंकेसाठी थांबले असता हालचालींवरून शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. तत्पूर्वी तलवाडा घाटात पोलिसांनी स्कार्पिओचा पाठलाग केला. त्यामुळे हरिभाऊ कचरू मगर यांच्या अंगणात गाडी लपवून चोरटे पसार झाले. मगर यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.

चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांना फोन लावताच चोरटे झटका मारून पळाले. एकाने विहिरीत उडी घेतली. त्याला नागरिकांनी दोरखंडाने बाहेर काढले. तर दुसऱ्याला पाठलाग करून पकडले. शिऊर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार चाकी वाहन व एटीएम मशीनदेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime
Nashik Fraud Crime : द्राक्ष व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना 22 लाख रूपयांना गंडा! पिंपळगाव बसवंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com