Nashik Crime News : वाद मिटवायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला! जमीनमालक अन बांधकाम व्यावसायिकात सुरू होता वाद

Crime News : बांधकाम प्रकल्पावरून बांधकाम व्यावसायिक आणि जमीनमालकांमध्ये अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होते.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केवल पार्क रस्त्यावर एका बांधकाम प्रकल्पावरून बांधकाम व्यावसायिक व जमीनमालकांमध्ये वाद सुरू असल्याचे समजताच तो मिटवायला गेलेल्या अंबड पोलिसांच्या पथकावर जमीनमालकांसह काहींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Attack on police went to settle dispute )

बांधकाम प्रकल्पावरून बांधकाम व्यावसायिक आणि जमीनमालकांमध्ये अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होते. बांधकाम व्यावसायिकाने जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यावर जमीनमालकांनी या ठिकाणी काम थांबवून शिवीगाळ, मारहाण सुरू केली.

घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळाल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह महिला पोलिस उपनिरीक्षक व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, त्याला जमीनमालकांनी आक्षेप घेतला. तसेच, बांधकाम व्यावसायिकांची बाजू घेतल्याने संतप्त जमीनमालक व त्यांनी बोलावलेल्या जमावाकडून थेट पोलिसांनाच शिवीगाळ करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या हल्ल्यात पोलिस निरीक्षकांसह महिला पोलिस उपनिरीक्षक व अन्य दोन कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी फौजफाटा बोलावून एका महिलेसह पाच ते सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या पोलिसांवरच प्राणघातक हल्ला झाल्याने या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.

केवल पार्क रोडवर एक बांधकाम प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून अर्धवट अवस्थेत रखडलेला आहे. येथे ४२ गाळे असून, बांधकाम व्यावसायिक, मूळ जागामालक व त्यांचे वारसदार यांच्यात वादविवाद सुरू आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या ठिकाणी काम सुरू करण्याचे पत्र दिले होते. (latest marathi news)

Crime News
Dhule Crime News : भांडीवाटपात वशिलेबाजी, काळाबाजार! कामगार महिलांचा आरोप

यानुसार बांधकाम व्यावसायिकाने या ठिकाणी कामासाठी माणसे पाठविली. जागामालकांनी हे काम थांबविले आणि त्यातून बांधकाम व्यावसायिक अन जमीनमालकांत या वेळी वादविवाद व वादावादी झाली. घटना घडली, त्या ठिकाणी खरोखर पोलिस यंत्रणेला भांडणे सुरू असल्याचा कॉल आला का? की पोलिस या ठिकाणी मध्यस्थी करून प्रकरण मिटवायला गेले होते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

बेबी ऊर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री धोंगडे, राधिका गाडे यांच्यासह पाच ते सहा जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका महिलेसह पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

"आम्हाला फोन आल्यावर घटनास्थळी गेलो. तिथे भांडण सुरू होते, ते मिटविण्यासाठी मध्यस्थी केली असता मला व महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या हाताला चावा घेत मारहाण केली. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

- सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड

Crime News
Nashik Crime News : स्थानिक युवकाच्या मदतीने सोनसाखळी चोरट्यांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.