Nashik Crime News : अंबडची इंडियन बँक फोडण्याचा प्रयत्न! गॅस कटर, हातोड्याने पाडले भगदाड

Nashik News : अंबड एमआयडीसी शाखेच्या इंडियन बँकेच्या पहिल्या स्लॅबवर भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेतील लॉकर व तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला.
the hole in Bank slab
the hole in Bank slab esakal
Updated on

Nashik News : मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाट्यापासून गरवारेकडे जाणाऱ्या रोडवर अंबड एमआयडीसी शाखेच्या इंडियन बँकेच्या पहिल्या स्लॅबवर भगदाड पाडून चोरट्यांनी बँकेतील लॉकर व तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांचा प्रयत्न फोल ठरला. (Crime Attempt to break Ambad Indian Bank)

विशेष म्हणजे वर्षभरात बँकेची तिजोरी लुटण्याचा दुसरा प्रयत्न असल्याने बँकेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे व्यवस्थापक अजितेश कुमार यादव (४२) यांनी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी (ता. १९) पहाटे पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

चोरट्यांनी बँकेच्या बाहेर गॅस कटर सिलिंडर ठेवून बँकेच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. यानंतर छिन्नी, हातोडा व कटर मशिनच्या साहाय्याने तिजोरी तसेच बँकेचे लॉकर असलेल्या मोठे भगदाड पाडले. यानंतर दोरीच्या साहाय्याने चोरट्यांनी आत प्रवेश करून बँकेतील लॉकरचे कुलूप व तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने चोरट्यांचा तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फोल ठरला.

विशेष म्हणजे मध्यरात्री सायरन वाजल्यानंतर बँकेचे पूर्वीचे व्यवस्थापक यांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज आला. त्यांनी सध्याचे व्यवस्थापक यादव यांना फोनद्वारे घटनेची माहितीदेखील कळवली. मात्र, यादव यांनी माझ्या घरासमोरच बँक असून असा कोणताही प्रकार नसून याकडे दुर्लक्ष केले. सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता बँक उघडल्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तिजोरीची रूम उघडल्यानंतर त्यांना भगदाड पडलेले दिसले. (latest marathi news)

the hole in Bank slab
Nashik Fraud Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून 34 लाखांना गंडा; दोघांविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

तसेच लॉकर तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर काही मिनिटात मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनेची माहिती लक्षात घेतली. तीन वेगवेगळी पथके तयार करून चोरट्यांचा तपास घेण्यासाठी रवाना केली.

बँकेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

मागील वर्षभरापूर्वी याच बँकेत अशाच प्रकारे चोरट्यांनी स्लॅबला भगदाड पाडून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिस प्रशासनाने शहरासह सर्वच बँकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या बँकेलादेखील पोलिसांनी चार ते पाच वेळेस पत्रव्यवहार केला आहे. मात्र बँक व्यवस्थापन आणि या ठिकाणी केवळ दोन ते तीन निकृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही लावून सुरक्षारक्षक नेमला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.

the hole in Bank slab
Nagpur Crime : आधी मस्ती नंतर प्रियकरावर चाकूने वार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com