Nashik Abduction News : युवतीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न! देवळाली कॅम्पातील घटना

Nashik News : पीडितेला बोलायचे म्हणून रिक्षाजवळ घेऊन आल्यानंतर संशयिताने तिला चावा घेत रिक्षात बसवून बळजबरीने अपहरण केले.
Abduction Crime
Abduction Crimeesakal
Updated on

Nashik News : पीडितेला बोलायचे म्हणून रिक्षाजवळ घेऊन आल्यानंतर संशयिताने तिला चावा घेत रिक्षात बसवून बळजबरीने अपहरण केले. त्यानंतर तिला रेल्वे रुळावर नेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने उभे केले. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तिला वाचविले. याप्रकरणी संशयिताविरोधात अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempt to kidnap and kill young woman)

पंकज राजेंद्र गांगुर्डे (२६, रा. हाडोळा, देवळाली कॅम्प) असे संशयित युवकाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १) दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित हा फिटनेट ऑफिससमोर पीडितेला भेटण्यासाठी आला असता, त्यावेळी तिने त्यास समजावून बाहेर काढून दिले.

त्यानंतर पुन्हा आला आणि पाच मिनिटे बोलायचे म्हणून तिला रिक्षाजवळ घेऊन गेला. त्यावेळी संशयिताने तिच्या हनवटीला चावा घेत तिला बळजबरीने तोंड दाबून रिक्षात बसविले आणि तिचे अपहरण केले. त्यानंतर तो रिक्षा खर्जुळ मळयाकडे घेऊन गेला. (latest marathi news)

Abduction Crime
Nashik Crime News : पहिला अदखलपात्र गुन्हा पंचवटीत दाखल! नवीन भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी सुरू

तेथे पीडितेला ओढत -ओढत रेल्वे रुळाकडे घेऊन गेला आणि रेल्वे रुळावर उभे करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने आरडा ओरडा केल्याने लोकांनी तिला वाचविले.

तर संशयिताने तिच्याकडील मोबाईल फोन हिसकावून ते तिच्या आईला फोन करून, तुझ्या मुलीला रेल्वेखाली ढकलून देतो असे बोलून फोन बंद केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक एस.ए. चव्हाण हे तपास करीत आहेत.

Abduction Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime : जमिनीच्या वादातून वडिलांना मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.