Nashik Money Laundering Fraud : ‘हॅलो, दिल्ली इडी ऑफिसचे बात कर रहा हूँ, आपके बँक अकाऊंट का इस्तेमाल कर के किसीने मनीलॉन्ड्रिंग की गई है... आप घर से कही भी ना जाये... हमारी लोकल टीम आप के घर पहुंच रही है... आप के बँक के डिटेल्स इन्व्हेस्टीगेशन के लिए चाहिए...’ असा फोन आल्यानंतर कोणीही घाबरून जातो.
यानंतर काही मिनिटात पुन्हा दुसरा कॉल येतो. ‘हॅलो, हम दिल्ली सीबीआय से बात कर रहे है, हमे खबर मिली है की आपने बँक के जरिए मनीलॉन्ड्रिंग की है... आपकी बँक डिटेल्स की जानकारी के लिए हमारी टीम पहुंचने तक आप कही ना जाये...’ असे एकामागोमाग एक कॉलमुळे सावज व्यक्ती घाबरते.
आपल्या घरी इडी-सीबीआय येणार, घरझडती घेणार, परिसरात बदनामी होणार या भितीच्या सावटाखाली असतानाच, तिसरा कॉल येतो, ‘अगर आप इस कारवाई को रोखना चाहतो हो, हमारी टीम आपके घर नही आनी चाहिए तो आपके बँक डिटेल्स हमे भेजीए.. हम इन्व्हेस्टीगेशन करते है.. ’, अशा रितीने सायबर भामटे बँकेचे डिटेल्स घेताच, त्यावरील सर्व रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेत सावज व्यक्तीचे बँक खाते रिकामे करून टाकते.... (Bank account robbed by showing fear of money laundering)
पूर्वी लॉटरीचे आमिष दाखवून ओटीपी मागवून सायबर भामटे गंडा घालत. क्रेडिट कार्ड, नोकरी आमिष दाखवूनही फसवणूक केली जात होती. तर अलिकडे शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केली जाते. मात्र सध्या सायबर भामट्यांनी ‘मनिलॉन्ड्रिंग’ केल्याचे सांगत इडी (सक्तवसुली संचालनालय), सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी करून आत्तापर्यंत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
गेल्या साडेआठ महिन्यांमध्ये नाशिक सायबर पोलीस ठाण्याकडे ऑनलाईन फसवणुकीचे ७१ गुन्हे दाखल झाले आहेत. यातून युवा सुशिक्षित, उद्योजक, व्यावसायिकांपासून ते ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्ती अधिकार्यांना तब्बल ४४ कोटींना ऑनलाईन गंडा घातला आहे.
यामध्ये सर्वाधिक फसवणूक ही शेअर मार्केट, शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सुमारे २३ कोटी ७० लाखांची तर, मनिलॉन्िड्रंगची भिती दाखवून १४ कोटी २९ लाखांना ऑनलाईन गंडा घातला आहे. गतवर्षी २०२३ मध्ये १८ कोटींची ऑनलाईन फसवणूक झाली होती.
जनजागृतीनंतरही फसगत
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत दरमहा किमान चार ते पाच जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकून त्यांची फसगत होते आहे. ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी शहर सायबर पोलीस ठाण्याकडून सातत्याने जगजागृती केली जाते. शाळांमध्ये सायबर साक्षरतेचे उपक्रम राबविले जातात. बँकांमध्ये भित्तीपत्रके चिकटविले जातात.
तसेच, फसगत झाल्याचे वृत्तही प्रसारमाध्यमातून ठळकपणे प्रसिद्ध केले जाते. असे असतानाही शहरातील व्यावसायिक, सुशिक्षित नोकरदार, डॉक्टर, वकील, सेवानिवृत्त अधिकारी सायबर भामट्यांच्या जाळ्यात सहज अडकत स्वत:ची कोट्यवधींची फसवणूक करून घेत आहेत. (latest marathi news)
येथे साधा तत्काल संपर्क
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वरील www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर आणि सायबर हेल्पलाईन क्रमांक : १९३०, तसेच नजिकचे सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
कोणीही संपर्क साधत नाही
नाशिककरांनो, इडी, सीबीआय वा कोणत्याही शासकीय कार्यालयातून वा बँकेतून मोबाईलवर संपर्क साधला जात नाही. ईडी, सीबीआयची कारवाई ही थेट छापा टाकून होत असते. त्यामुळे, मनीलॉन्ड्रिंग वा कुरियरमध्ये ड्रग्ज सापडले असे सांगून कारवाईची भिती दाखविणारे कॉल आल्यास ते सायबर भामटे असतात, हे ओळखावे. अशा कॉल्सला वा व्हॉटसॲपवरील कोणत्याही अनोळखी लिंकला ओपन करू नये.
फसवणूक ..... गुन्हे ....... फसवणूक रक्कम
शेअर बाजार गुंतवणूक ...२९ .....२३ कोटी ७० लाख २८ हजार ६१९ रुपये
इडी/सीबीआयची बतावणी ..... ९ .... १४ कोटी २९ लाख ८४ हजार ३८३ रुपये
नोकरीचे आमीष ..... ५ ..... २ कोटी १२ लाख २८ हजार ६०२ रुपये
ऑनलाइन खरेदी ...... ३ ..... १ कोटी ७१ लाख ८ हजार १८५ रुपये
क्रेडिट/डेबिट कार्ड ...... २ ..... १ कोटी १ लाख ५३ हजार ५१९ रुपये
वेबसाइट/जाहिरात ..... ३ ..... ५८ लाख ९३ हजार ८८० रुपये
एनी डेस्क ॲप ..... ४ ..... ३६ लाख ७६ हजार ३२२ रुपये
कुरिअर स्कॅम ..... २ ..... ३५ लाख ७४ हजार ८०६ रुपये
एमलजीएल बिल ..... १ ..... १६ लाख ४७ हजार ७५९ रुपये
ओएलएक्स विक्री ..... १ ..... १० लाख १५ हजार ४०५ रुपये
ओटीपी .... २ .... ६ लाख रुपये
फ्रॉड कॉल ..... १ ...... २ लाख ७२ हजार ७८ रुपये
एकूण ...... ७१ ...... ४४ कोटी ५१ लाख ८४ हजार ५५८ रुपये
अशी बाळगा सावधगिरी
- सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्याच्यावर विश्वास ठेऊ नका
- व्हॉटसॲपवर आलेली लिंक ओपन करू नका
- अनोळखी व्यक्तीने सांगितलेले ॲप (ऍनीडेस्क) मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नका
- बँकेची गोपनीय माहिती, आधारकार्ड, पॅनकार्डची माहिती कोणालाही फोनवरून शेअर करू नका
- ऑनलाईन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा
"सीबीआय, इडी, बँका, कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करणारे हे सायबर गुन्हेगार असतात. असे कॉल आल्यास घाबरून न जाता सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच आर्थिक गुंतवणूकीतून जादा परताव्याचे आमिषालाही बळी पडू नये. फसवणूक झाल्यास तत्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल (NCCRP) वा हेल्पलाईन १९३० यावर संपर्क साधावा." - प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.