Nashik Crime News : नानावलीतून प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हेशाखा युनिट एकच्या कारवाईत एकाला अटक

Nashik News : जुने नाशिक परिसरातील नानावली परिसरात चोरीछुप्यारितीने प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Prohibited Gutkha seized from Nanavali. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Prohibited Gutkha seized from Nanavali. Along with the team of Unit One of the City Crime Branch.esakal
Updated on

Nashik News : जुने नाशिक परिसरातील नानावली परिसरात चोरीछुप्यारितीने प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून ९७ हजार २१३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करीत एकाला अटक केली आहे. (Nashik Crime Banned Gutkha Seized From Nanavali)

मोसिन यूनूस सय्यद (३१, रा. अहमद रजा चौक, नानावली, भद्रकाली) असे संशयिताचे नाव आहे. युनिट एकचे अंमलदार अमोल कोष्टी यास प्रतिबंधित गुटख्याची खबर मिळाली होती. युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके.

विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांच्या पथकाने नानावलीतील अहमद रजा चौकातील एका घराची पाहणी केली. त्यावेळी संशयित सय्यद प्रतिबंधित पानमसाला. (Latest Marathi News)

Prohibited Gutkha seized from Nanavali. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Nashik Crime News : नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह तिघांना बेड्या!

सुगंधीत तंबाखु अवैधरित्या विक्री करीत होता. पथकाने संशयित सय्यद यास अटक करून त्याच्या ताब्यातून साठा केलेला प्रतिबंधित गुटखा असा ९७ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

संशयिताकडे केलेल्या चौकशीतून सदरील गुटखा त्याने वैभव उर्फ अशोक मोराडे याच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Prohibited Gutkha seized from Nanavali. Along with the team of Unit One of the City Crime Branch.
Nashik Crime News : मनपा कर्मचार्याच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.