Nashik Crime News : सिडकोत भाईगिरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने थेट बार मालकालाच दरमहा पाच हजार रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले आहे. खंडणी न दिल्यास चॉपरने हातपाय कापून टाकण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. (Nashik Crime Bar owner threatened for extortion)
गणेश कुऱ्हे (रा. सिडको, नाशिक) असे खंडणीसाठी धमकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अनिल पाटील (रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, पाटील यांच्या मालकीचे सिडकोतील उत्तमनगर येथे हॉटेल पूनम बार आहे. संशयित गणेश कुऱ्हे हा सिडको परिसरात भाईगिरी करतो.
त्याच्यावर विविध स्वरुपाचे गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, कुऱ्हे याने शनिवारी (ता. १३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास बार मालक पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि ‘पूनम बार चालू ठेवायचे असेल तर, दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. (latest marathi news)
संध्याकाळपर्यंत पाच हजार रुपये नाही आले तर चॉपरने तुझे हातपाय तोडतो’ अशी धमकीही दिली. त्यानंतरही त्याने वारंवार संपर्क साधत धमकावले. त्यामुळे पाटील यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयित कुऱ्हे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुऱ्हेची अटक अन् सुटका
गुन्हा दाखल होताच अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने संशयित कुऱ्हेचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे संशयिताचा माग काढत त्यास अटक केली. पोलीस चौकशीत कुऱ्हे याने गुन्ह्याची कबूली दिली. संशयिताला अटक केली, परंतु गुन्हा जामीनपात्र असल्याने त्याची कायदेशीर प्रक्रिया करून सुटका करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.