Nashik News : पोलिस यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने अवैध धंद्यांना ऊत आला होता. कळवण पोलिस उप विभागाच्या हद्दीत सुरगाणा, कळवण, वणी, अभोणा या परिसरात अवैध धंद्यांने डोके वर काढले होते. जुगार, मटका, दारुचे अड्डे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, वृद्ध, शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना टवाळखोरांपासून त्रास होत असे. याबाबत ‘सकाळ’ मध्ये २५ मेस बातमी प्रसिद्ध झाली होती. (Nashik Crime Bars destroyed in Surgana)
बातमी प्रसिद्ध होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कळवण पोलिस उपविभागात अवैध दारूअड्ड्यांवर कठोर कारवाई करीत अवैध धंदेचालकांच्या मुसक्या आवळल्या. अवैध दारूअड्ड्यांवर छापा टाकून, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरगाणा तालुक्यातील चंद्रपूर गावाच्या शिवारात एक हजार ८५० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे.
या प्रकरणी हिरामण वळवी, समीर सलीम कच्छी (रा. उंबरठाण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरठाण येथील गुजरात सीमेलगतच्या निंबारपाडा येथील जुगारअड्डा नष्ट केला आहे. तर पांगारणे येथील जुगारअड्डा उद्ध्वस्त केला आहे. सुरगाणा शहरातील पोलिस लाइन गुजरात सीमेलगतच्या तळपाडा येथील जुगारअड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
तर कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडावरील वन विभागाच्या भिंतींच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन हजार ३६० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली, तसेच तळ्याच्या रस्त्याकडील मंमादेवी मंदिरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये एक हजार ६८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. (latest marathi news)
या प्रकरणी मुकेश शार्दूल (रा. सप्तशृंगगड), तुळशीराम बागूल (रा. पाळे पिंपळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दिंडोरी तालुक्यातील वणी-पिंपळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमाणीसमोरील बोळीमध्ये दोन हजार ७३० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. या प्रकरणी विजय गोतरणे (रा. वणी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के, शिवाजी ठोंबरे, पोलिस हवालदार प्रवीण सानप, खराटे, घुगे यांनी कारवाई करण्यात सहभाग घेतला. या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.