Nashik Crime : वडाळागावात भोंदूबाबाने केला विवाहितेवर बलात्कार; भुतबाधा उपचाराच्या नावाखाली निघृण कृत्य

Crime News : याबाबत वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयित भोंदूबाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime Against Women
Crime Against Womenesakal
Updated on

Nashik Crime : अंबड परिसरातील विवाहितेवर पोटदुखीच्या इलाजासाठी वडाळागावातील संशयित भोंदूबाबाकडे नेण्यात आले. त्यावेळी संशयित भोंदू बाबाने तिला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्यावर उपचार सुरू केले. यादरम्यान तिला गुंगीचे औेषध देत त्याने बलात्कार केला.

तसेच याबाबत वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयित भोंदूबाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhondubaba raped married woman in Wadalagaon)

Crime Against Women
Nashik Crime News : इंडियन बँक फोडीतील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून जेरबंद; घरफोडीच्या एकूण 7 गुन्ह्यांची उकल

हुसन यासीम शेख (रा. मेहमूद नगकर गल्ली नंबर-२, वडाळागाव) असे संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. पीडित १९ वर्षीय विवाहितेचे पोट दुखत असल्याने पती, सासूच्या सल्लाने वडाळागावातील हकिमाकडे उपचारार्थ नेले होते. वारंवार पाेट दुखत असल्याने शुक्रवारी (ता. २६) पीडिता हुसनकडे आली. त्याने पीडितेला भूतबाधा झाल्याचे सांगत तिच्यावर उपचार सुरू केले.

या दरम्यान तिच्यावर गुंगीकारक औषध दिल्याने पीडितेची शुद्ध हरपून ती बेशुद्ध झाली. तेव्हा त्याने अत्याचार केल्याचा आराेप पीडितेने केला आहे. दरम्यान, हुसनला अटक झाली असून त्याला न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. तपास सहायक निरीक्षक सुनील अंकाेलीकर करत आहेत.

Crime Against Women
Dhule Crime News : धुळ्यात पावणेतीन लाखांचा गांजा जप्त! एलसीबीच्या कारवाईत मध्य प्रदेशातील संशयिताला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.