Nashik Crime News : पंचवटीत पोलीस चौकीसमोरच भूषण लोंढेकडून गोळीबार

Latest Crime News : तीन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराची वाच्यता झाल्याने पोलिसांनी याची दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शनिवारी (ता. १२) पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
pistol
pistol esakal
Updated on

Nashik Crime News : पंचवटी पोलीस ठाण्याच्या मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीसमोर माजी नगरसेवक पूत्र व सराईत गुन्हेगाराने एकावर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराची वाच्यता झाल्याने पोलिसांनी याची दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शनिवारी (ता. १२) पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. (Bhushan Londhe fired in front of police)

माजी नगरसेवक पूत्र व सराईत गुन्हेगार भूषण लोंढे, प्रिन्स चित्रसेन सिंग व साथीदारांविरोधात पंचवटी पोलीसात गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पोलीस उपनिरीक्षकांच्या फिर्यादीनुसार, सदरील गोळीबाराची घटना बुधवारी (ता.९) मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीसमोर घडली आहे.

संशयित हे काही टोळक्यांसोबत त्याठिकाणी आले असता, त्या आपसात वाद झाला. त्यावेळी संशयित भूषण लोंढे याने एकाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या आहेत. सुदैवाने पळ काढल्यास संबंधित युवक बचावला. त्यानंतर संशयितांनी काडतुसांच्या पुंगळ्या घेऊन पसार झाले. या घटनेची तीन दिवसांनंतर परिसरात वाच्यता झाली.

यासंदर्भात पोलिसांकडेही काहीही माहिती नव्हती. परंतु झालेल्या घटनेची सत्यता पडताळणीसाठी गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यातून गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शनिवारी (ता. १२) संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पथके पसार झालेल्या संशयितांचा शोध घेत आहेत. (latest marathi news)

pistol
Nashik Crime News : हुल्लडबाजीला पोलिसांकडून चाप! चाळीसगाव फाट्यावर वाहनांची तपासणी

गोळीबार का?

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना ज्यावर गोळीबार झाला त्याचकडे चौकशी केली असता, त्याने तसे काही झाले नसल्याचा बचावात्मक पवित्रा घेतल्याचे समजते. परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, संशयित लोंढे याने गोळीबार का व कशासाठी केला याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

दुहेरी खुनातून सुटका

२०१५ मध्ये सराईत गुन्हेगार अर्जुन महेश आव्हाड ऊर्फ वाट्या व निखिल विलास गवळे या दुहेरी खुन खटल्यात भूषण लोंढे हा सात वर्षे कारागृहात होता. या खटल्यातून लोंढे याच्यासह प्रिन्स सिंग व सहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. या गोळीबाराच्या घटनेने लोंढे पुन्हा चर्चेत आला असून, पोलीसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

pistol
Nashik Crime News : संशयितांना मोक्का लावण्याचा प्रस्ताव! बडगुजरच्या जामीन अर्जावर आज निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.