Nashik Crime: राज्य उत्पादन शुल्क विभागाची दहावा मैल येथे कारवाई! नियमांचे पालन न करणाऱ्या 2 मद्यविक्रेत्यांचे परवाने निलंबित

Crime News : ओझर शिवारातील दहावा मैल येथील दोन हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
Shops at Dahava Mail
Shops at Dahava Mailesakal
Updated on

Nashik Crime : मद्यविक्रीसाठीच्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या, तसेच मद्यविक्रीबाबतचे रेकॉर्ड सादर करू न शकणाऱ्या हॉटेलचालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) कारवाईचा बडगा उगारला आहे. ओझर शिवारातील दहावा मैल येथील दोन हॉटेल्सवर कारवाई करून त्यांचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. (Nashik Crime action by State Excise Department at dahava mail marathi news)

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या दोन वेगवेगळ्या पथकांकडून दहावा मैल परिसरातील 'हॉटेल द किकर' आणि अभिज रेस्ट्रो बारची पाहणी करण्यात आली. त्यावेळी या पथकांना अनेक त्रुटी आढळून आल्या पथकांना करूनही हॉटेल किकरचे परवाना संबंधित परवानाधारक एफएलआर-३ नोंदवह्या निरीक्षणकामी सादर करू शकले नाहीत.

याशिवाय तेथे उपस्थित व्यक्तींचे नोकरनामेदेखील सादर केले नाहीत. हॉटेल द किकरचा परवाना लता कमोद यांच्या नावे असून, कॅश मेमो व शेरेपुस्तिका सादर केल्या नाहीत. संबंधित दोन्ही हॉटेलच्या मंजूर नकाशात मद्यविक्री ही परमिट करणे आवश्यक असताना रेस्टॉरंटमध्ये काऊंटर लावून सीलबंद बाटलीतून मद्यविक्री होत असल्याचे, तसेच किचन रेस्टॉरंटदेखील कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. (Latest Marathi News)

Shops at Dahava Mail
Nagpur Crime: नागपुरात 'स्पेशल २६'! गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रोकड केली जप्त, पण पोलीस निघाला 'तोतया'

हॉटेल अभिज रेस्ट्रो बार येथे देखील अनियमितता आढळून आली. कामगारांचे नोकरनामे, कॅश मेमो, शेरेपुस्तिका सादर न करणे, ग्राहकांना विनापरवाना मद्यविक्री करणे, हॉटेलच्या दर्शनी भागात परवान्याचा माहितीफलक लावला नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सटाणा येथील भरारी पथकाला आढळून आले. अभिषेक निगळ यांचे हे हॉटेल असून, त्यांचा परवानादेखील १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.

Shops at Dahava Mail
Nagpur Crime: पैशांचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ५५ वर्षीय आरोपीला २० वर्षांची शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.