Nashik Crime News : जॉय रायडिंगसाठी चोरल्या दुचाकी; विधीसंघर्षित बालकांकडून 11 दुचाकी हस्तगत; म्हसरूळ पोलिसांची कामगिरी

Latest Crime News : जॉय रायडिंगसाठी दुचाकी चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस हवालदार सतीश वसावे करीत आहेत.
11 two-wheelers seized from children in conflict with the law. Performance of Mashrul Crime Investigation Team. Two-wheelers were stolen by joy riding.
11 two-wheelers seized from children in conflict with the law. Performance of Mashrul Crime Investigation Team. Two-wheelers were stolen by joy riding.esakal
Updated on

पंचवटी : विधीसंघर्षित बालकांकडून ११ दुचाकी हस्तगत करण्यात म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. जॉय रायडिंगसाठी दुचाकी चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस हवालदार सतीश वसावे करीत आहेत. (Bikes stolen for joy riding)

नाशिक शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे उकल करण्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.४) रोजी म्हसरूळ गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घालीत होते.

यावेळी पोलिस अंमलदार प्रशांत देवरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पेठरोडवरील मेहेरधाम परिसरात दोघे जण संशयितरीत्या फिरत असल्याचे समजले. या भागात पोलिस येताच, या संशयित दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेठ रोडवरील एसटी वर्कशॉपजवळ या दोघांना ताब्यात घेतले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

मात्र, ज्या दुचाकीहून पळ काढण्याचा प्रयत्न करीत होते, तिचे इंजिन चेसी नंबर चेक केले असता ती दुचाकी चोरीची आढळली. दोघाही संशयिताच्या आई-वडिलांकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या अजून चार ते पाच साथीदारांसोबत म्हसरूळ चार, पंचवटी व उपनगर प्रत्येकी दोन, भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतून एक अशा एकूण ११ चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या दुचाकी जॉय रायडिंगसाठी आपापसांत फिरवा फिरवी करून मौजमजा करीत असल्याचे सांगितले. (latest marathi news)

11 two-wheelers seized from children in conflict with the law. Performance of Mashrul Crime Investigation Team. Two-wheelers were stolen by joy riding.
Pune Crime News: स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार, पोलिसांनी काय माहिती दिली?

यांनी बजाविली कामगिरी

ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त पोलिस किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अतुल डहाके, पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर, दीपक पटारे, पोलिस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसावे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, पोलिस अंमलदार पंकज चव्हाण, गुणवंत गायकवाड, पंकज महाले, योगेश सस्कर, प्रशांत देवरे, जितेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर कातकाडे, गिरिधर भुसारे यांनी केली आहे.

11 two-wheelers seized from children in conflict with the law. Performance of Mashrul Crime Investigation Team. Two-wheelers were stolen by joy riding.
Dhule Crime News : अतिक्रमित वनजमिनीच्या वादातून गोळीबार; रामपुरा फाटा परिसरात तीन जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.