Nashik Crime: प्लॉट LICने लिलावात काढल्याची बतावणी करुन शाखा व्यवस्थापक अन त्याच्या साथीदाराने महिलेची केली 8 लाखांची फसवणूक

Fraud Crime News : दोघांनी एका महिलेकडुन ८ लाख १६ हजार रुपये घेतले. परंतु त्या बदल्यात प्लॉट महिलेच्या नावावर केला नाही आणि रक्कमही परत न करता फसवणूक केली.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

ओझर : लाईफ इन्शुरन्स कंपनीने प्लॉट लिलावात काढला असल्याची बतावणी करुन विक्री करण्याच्या बहाण्याने एलआयसी शाखा व्यवस्थापकासह दोघांनी एका महिलेकडुन ८ लाख १६ हजार रुपये घेतले. परंतु त्या बदल्यात प्लॉट महिलेच्या नावावर केला नाही आणि रक्कम ही परत न करता फसवणूक केली. प्लॉट व रकमेबद्दल विचारना केल्यानंतर दोघांनी महिलेस धमकी दिली. (Nashik Crime branch manager his accomplice cheated womanunder name LIC)

दिनांक २ जानेवारी २०२४ ते दिनांक १३ जुन पर्यंत श्रीमती माने रा. फ्लॅाट नं 06 व 07 सिध्दीविनायक इंडस्ट्रिअल ईस्टेट ओझर ता. निफाड यांच्या घरी उल्हास पंडीत रा. इंंदिरा नगर, नाशिक व महेंंद्र जोशी एलआयसी शाखा मॅनेजर रा. गडकरी चौक, नाशिक या दोघांनी संगनमत करुन अनिल गोविंद कुलकर्णी, रा. जानोरी रोडवरील प्लॉट नं. 25, गट नं. 2511, अमृत नगर मागे, जानोरी रोड, मुबई आग्रा रोड, ओझर शिवार, ता. निफाड, जि. नाशिक यांच्या मालकीच्या प्लॉटवर 'बाणगंगा पतसंस्था ओझर'चा बोजा असल्याचे माहित असताना सुद्धा हा प्लॉट एलआयसीने लिलावात काढलेला असल्याचे सांगुन सदरचा प्लॉट लिलावात विक्री करण्याच्या बहाण्याने संगनमत करून श्रीमती माने यांच्याकडुन आठ लाख सोळा हजार घेवून ही तो प्लॉट नावावर केला नाही आणि श्रीमती माने यांची रक्कमही परत केली नाही. (latest marathi news)

Fraud Crime
Nagpur Crime : सुपारी किलिंगप्रकरणी सातव्या आरोपीला अटक; अर्चना पुट्टेवारला तीन दिवसांची कोठडी

त्यांची फसवणुक केली असुन श्रीमती माने यांनी पंडीत व जोशी यांना त्याबाबत विचारणा केली असता, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली असल्याची तक्रार श्रीमती माने यांनी ओझर पोलिस ठाण्यात नोंदविल्यावरुन ओझर पोलिसांनी पंडीत व जोशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक अरुण धनवडे हे करीत आहेत.

Fraud Crime
Nashik Crime News : संतापजनक घटना! अडीच वर्षाच्या चिमुरडीवर चुलत काका कडुन अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.