Nashik Crime News: तब्बल 5 वर्षांनी घरफोडीचा गुन्हा दाखल! पोलीस महासंचालकांनी दिले आदेश; मात्र संशयितांवर होईना कारवाई

Crime News : जऊळके शिवारात (ता. दिंडोरी) असलेल्या भाड्याच्या गाळ्यातील भांडी बनविण्याच्या मशिनरी व साहित्य असा ६६ लाखांचा मुद्देमाल शटर तोडून चोरी केल्याचा गुन्हा तब्बल ५ वर्षांनी दिंडोरी पोलीसात दाखल झाला आहे
Burglary Crime News
Burglary Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : जऊळके शिवारात (ता. दिंडोरी) असलेल्या भाड्याच्या गाळ्यातील भांडी बनविण्याच्या मशिनरी व साहित्य असा ६६ लाखांचा मुद्देमाल शटर तोडून चोरी केल्याचा गुन्हा तब्बल ५ वर्षांनी दिंडोरी पोलीसात दाखल झाला आहे. सदरचा गुन्हा दाखल होत नसल्याने फिर्यादींनी थेट पोलीस महासंचालकांचा दरवाजा ठोठावला.

अखेर त्यांच्या आदेशानुसार खडबडून जाग असलेल्या दिंडोरी पोलीसांनी गुन्हा दाखल तर केला, परंतु तीन आठवडे उलटूहनी अद्यापपर्यंत संशयितांविरोधात कोणतीही कारवाई न करणार्या पोलिस अधिकार्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी फिर्यादीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. (Nashik Crime Burglary case filed after 5 years Orders issued by Director General of Police news)

जितू ठक्कर, हिराभाई ठक्कर, विजय ठक्कर, मनोज चंदन, रिटा विजय चंदन, माधवी मनोज चंदन (सर्व रा. पंचवटी भाजीपाला मार्केट यार्डजवळ, पंचवटी, दिंडोरी रोड, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत.

तुषार दशरथ कासार (रा. विजयनगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, भांड्याचा कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी संशयितांचा जऊळके शिवारातील गाळा एप्रिल २०१५ मध्ये भाड्याने घेत ६० लाखांची मशिनरी बसविली. याठिकाणी लाईट, पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी भाडे देणे बंद केले होते.

दरम्यान, संशयितांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी गाळ्याचे लॉक तोडून कासार यांची मशिनरी क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये टाकून घेऊन गेले. याप्रकरणी त्यांनी दिंडोरी पोलीसात तक्रार केली. परंतु पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला नाही. याबाबत कासार यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली तरीही कारवाई झाली नाही.

पाच वर्षे दाद मागितल्यानंतर अखेर माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी असमाधानकारक उत्तर दिले. त्यावर अपिल केल्यानंतर तत्कालीन अधीक्षक शहाजी उमाप यांनी चौकशी करून तत्कालिन दिंडोरी पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही.

अखेर कासार यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे दाद मागितली असता, गेल्या मार्च महिन्यात महासंचालकांनी थेट घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानुसार अखेर ५ वर्षांनी १९ मार्च २०२४ रोजी दिंडोरी पोलीसात संशयितांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, कळवणचे उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी हे तपास करीत आहेत. (latest marathi news)

Burglary Crime News
Navi Mumbai Crime: पाच वर्षीय मुलीवर अत्याचार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

कारवाई मात्र होईना

घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन तीन आठवड्यांचा कालावधी झाला. अद्याप संशयितांविरोधात कोणतीही कारवाई दिंडोरी पोलिसांकडून झालेली नाही. त्यामुळे दिंडोरी पोलिसांनी केवळ पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला मात्र संशयितांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका कायम ठेवल्याने पोलिसांच्या भूमिकेवर कासारा यांनी संशय व्यक्त केला आहे.

आयजीकडे मागणी

कासार यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार अर्ज करीत याप्रकरणामध्ये संशयितांना मदत करणार्या २०१८ पासून ते आत्तापर्यंतच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते तपासी पोलीस अधिकार्यांचाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी कासार यांनी केली आहे.

"सदरील गुन्ह्यासंदर्भात तपास सुरू आहे. गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, लवकरच संशयितांविरोधात कारवाई केली जाईल."

- किरणकुमार सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, कळवण, नाशिक ग्रामीण

Burglary Crime News
Nagpur Crime News : फेसबुक फ्रेंडसोबत पत्नी पळाली; पतीची उच्च न्यायालयात धाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.