Riddles broken by thieves. In the second photo, the thieves were caught on CCTV.
Riddles broken by thieves. In the second photo, the thieves were caught on CCTV.esakal

Nashik Crime News : सायगावला 6 ठिकाणी घरफोड्या; घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik Crime : शनिवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास तालुक्यातील सायगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा ठिकाणी घरफोड्या केल्या.
Published on

Nashik Crime News : शनिवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास तालुक्यातील सायगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. तीन ठिकाणी चोरी झाल्याचे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ग्रामीण भागात छोट्यामोठ्या चोऱ्या होत असतात. मात्र, हे प्रमाण उन्हाळ्यात जास्त असते. भर पावसाळ्यात चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. (Crime Burglary incidents at 6 places in Saigon caught on CCTV)

शनिवारी पहाटे सुरुवातीला सायगाव फाटा येथील प्रसाद जेजूरकर यांच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी लोखंडी रॉडने तोडून गल्ल्यातील सहा हजार रुपये रोख रक्कम चोरी केली. यानंतर चोरट्यांनी परिसरातीलच सागर बत्तासे यांच्या घराचा कडी-कोयडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यावरच न थांबता गणपत उशीर, शरद ढाकणे, अमोल ढाकणे यांच्या घरीदेखील चोरीचा प्रयत्न झाला.

Riddles broken by thieves. In the second photo, the thieves were caught on CCTV.
Nashik Crime News : तडीपार संशयितांचा शहरात वाढता वावर! शहरासह जिल्हा पोलिसांसमोर आव्हान

यानंतर प्रकाश दारुंटे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. येथील सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, चोरीच्या या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे. तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी कोणीही तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

येवल्यात बुलेट चोरीला

शहरातील पारेगाव रोड येथील थोरात वस्तीवरून रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल चोरीला गेली आहे. थोरात वस्तीसमोरुन रात्रीच्या सुमारास बुलेट चोरीला गेल्याचे चेतन थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या घटनेत गवंडगाव शिवारातून दोन शेतकऱ्यांच्या विहिरीवरून इकोझेन कंपनीचे सोलरपंप चोरी गेले. येथील शेतकरी साईनाथ दाभाडे यांच्या शेतातील ४६ हजार रुपये किमतीचा, तर सुभाष भागवत यांच्या विहिरीवरील ३९ हजार रुपये किमतीचा सोलर पंप चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Riddles broken by thieves. In the second photo, the thieves were caught on CCTV.
Nashik Crime News : दुचाकीस्वाराच्या अंगावर घातली कार; कौटुंबिक वादातून घटस्फोटातील पतीला मारण्याचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.