Nashik Crime: काझीगढी, कुंभारवाडा भागात वाहनांची जाळपोळ! 8 दुचाकी, एक छोटा हत्ती टेम्पोसह हातगाडीची राख

Crime News : काझीगढी, कुंभारवाडा भागात अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी (ता.२०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाहनांची जाळपोळ केली.
Damaged vehicle. Police officers and staff during the panchnama of the incident.
Damaged vehicle. Police officers and staff during the panchnama of the incident.esakal
Updated on

जुने नाशिक : काझीगढी, कुंभारवाडा भागात अज्ञात समाजकंटकांनी मंगळवारी (ता.२०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाहनांची जाळपोळ (Fire) केली. त्यात आठ दुचाकी आणि एक छोटा हत्ती टेम्पो तसेच हातगाडीचे नुकसान झाले आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून या भागात वाहने जाळण्याची ही चौथी घटना आहे. दरम्यान वाहनांची तोडफोड, दगडफेक अशा घटनाही घडल्या आहेत. (Nashik Crime Burning vehicles marathi news)

जाळलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टॅंकच्या स्फोटाच्या आवाजाने वाहनांची जाळपोळ झाल्याचा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करताच अन्य रहिवासी धावत आले. वाहनधारकांनी पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर आग असल्याने अन्य नागरिकांनी अग्निशामक विभागास माहिती दिली.

त्यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेत सुमारे आठ ते नऊ वाहने जळून खाक झाली. तसेच याठिकाणी लावलेला शुभेच्छा फलकही जळाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. दिवसभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

जाळपोळीचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. गणेश निगुट यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेत गणेश निगुट, अभिषेक निगुट, मंगेश जाधव, नीलम शिंदे, हरिभाऊ गव्हाळे, आनंदा जाधव, मधुकर चांडोले व अन्य नागरिकांचे वाहने जळाली आहेत.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सतत अशा घटना घडत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही रहिवाशांकडून सांगण्यात आले. तर शिवजयंतीच्या दिवशी याठिकाणी काही जणांचे वाद झाले होते. त्यातूनही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

Damaged vehicle. Police officers and staff during the panchnama of the incident.
Crime News: मृतदेह लवकर आणून देण्याच्या बहाण्याने भामट्याने घातला गंडा

कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांत तीन खुनाच्या घटना, सातपूर भागात वाहनांची तोडफोड तसेच सिडकोतही दोन ठिकाणी काही दिवसांपूर्वी वाहन तोडफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. तर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जुने नाशिक कुंभारवाडा भागात वाहनांची जाळपोळ झाली. या घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून संशयितांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

"दोन ते तीन महिने झाले की कुठली ना कुठली घटना या ठिकाणी घडतेच. यापूर्वीही अशी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी सीट फाडण्याची घटना घडली होती."- सागर फडोळ, पीडित

"घटनेत आमची दोन्ही वाहने जळून राख झाली. एक टेम्पो आणि एक दुचाकीचा समावेश आहे. कुणाशी वाद नव्हता. नागरिकांनी आरडाओरड केल्यावर लक्षात आले."

- माणिक निगुट, पीडित

"मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना घडली आहे. नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता अधिक असल्याने वाहन पूर्णपणे जळून गेले."

- मधुकर चांडोले, पीडित

Damaged vehicle. Police officers and staff during the panchnama of the incident.
Crime News: नाशिक-मुंबई महामार्गावरून ३ कोटींची तंबाखू जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.