Nashik Crime News : प्रवासी, नातेवाईकाकडून बसचालकास मारहाण; मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nashik Crime : बसमध्ये चढण्यास मज्जाव केल्याने प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईक यांनी बसचालक यांना बेदम मारहाण केली.
Beating the bus driver.
Beating the bus driver.esakal
Updated on

Nashik Crime News : बसमध्ये चढण्यास मज्जाव केल्याने प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईक यांनी बसचालक यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी चालक आनंदा नन्नवरे यांनी मनमाड पोलिसात फिर्याद दाखल केली. संशयित प्रवासी मंगेश सहस्रबुद्धे यांनी मलाच बसचालक यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली असून पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखल न घेतल्याने वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. (Nashik Crime Bus driver beaten by passenger and relative in Manmad marathi News)

दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले मंगेश सहस्रबुद्धे हे यांचे ऑपरेशन झाल्याने नाशिक येथे खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेले होत. उपचार झाल्यानंतर मेळा बसस्थानकावर फलाटावर बस लागली नसल्याने बाजूला लागलेल्या बसमध्ये बसण्यास गेले असता चालक व वाहकांनी ते आजारी असतानाही त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांना बसमध्ये बसण्यास मज्जाव केला. यावरुन चालक, वाहन यांच्याशी त्यांचा वादही झाला.

त्यानंतर नियंत्रकांनी वाद मिटवला. यानंतर मंगेश सहस्रबुद्धे यांच्यासोबत झालेला प्रकार त्यांच्या नातेवाईक यांना समजला. त्यानंतर नातेवाईक यांनी बस मनमाड बस स्थानक येथे येताच चालक श्री. नन्नावरे यांना जाब विचारत त्यांना बेदम मारहाण केली. तर वाहन ऊर्मिला बढे यांनाही दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

Beating the bus driver.
Nashik Crime News : इंदिरानगरला सलग दुसऱ्या दिवशी चैनस्नॅचिंग

प्रवासी मंगेश सहस्रबुद्धे यांच्या सांगण्यावरूनच ही मारहाण केल्याने याप्रकरणी चालक आनंद महादू नन्नावरे (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून संशयित हेमंत सोनवणे, सुमीत अनिल सहस्रबुद्धे, सत्यजित केदारे व एक महिला यांच्याविरुद्ध मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याउलट वाहक आणि चालक यांनी मला बसमध्ये बसण्यास मज्जाव करीत ओढत नियंत्रक यांच्याकडे नेले. तसेच धक्काबुक्की केल्याचा आरोप मंगेश सहस्रबुद्धे यांनी केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी दखल न घेतल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Beating the bus driver.
Nashik Crime News : प्राणघातक हल्ल्यातील दोघांना मालेगावातून अटक; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.