Nashik Crime: समझोताच्या नावाखाली ‘वेळकाढू’पणा केल्याने ‘त्या’ गुन्ह्याला बगल! मद्यपी कारचालकाचा अपघातानंतर समझोतापासून घुमजाव

Crime News : संशयित कारचालकाने वेळकाढूपणा केल्यामुळे ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या गुन्ह्याला त्याने बगल दिल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : पाथर्डी फाट्याजवळ अंबड-सातपूर लिंकरोडवर मद्यपी कारचालकाने धडक दिल्याने दोन कारचे नुकसान झाले तर एक कारचालक युवती जखमीही झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल न होण्यासाठी संशयित कारचालकाने समझोताच्या नावाखाली नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.

परंतु २४ तास उलटताच त्याने घुमजाव केल्याने अपघातग्रस्त कारचालक युवतीच्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यामुळे संशयित कारचालकाने वेळकाढूपणा केल्यामुळे ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या गुन्ह्याला त्याने बगल दिल्याची चर्चा यामुळे रंगली आहे. (delaying in name of settlement crime filed avoided ambad satpur drinking accident)

शुभम पाटील असे संशयित कार (एमएच १५ जीएल ०७३२) चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुजा प्रकाश सुराणा (रा. नेहरू पथ, भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास युवती त्यांच्या कारने (एमएच ०२ सीपी ०४१७) घरी जात असताना पाथर्डी फाट्याजवळील महाले पेट्रोल पंपासमोर संशयित शुभम याने राँग साईड कार चालवून सुराणा व धीरज पाटील (एमएच ४१ सी ७३५४) यांच्या कारला धडक दिली.

यात दोन्ही कारचे नुकसान झाले. तसेच, अनुजा सुराणा यादेखील जखमी झाल्या. अपघातानंतर याठिकाणी गर्दी जमा झाली आणि काहींनी यावेळी मोबाईलवर शुटिंगही केले. यावेळी संशयिताने जखमी युवतीला नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत त्याने काहीही केले नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता. २८) रात्री उशिरा याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास हवालदार राऊत हे करीत आहेत. (latest marathi news)

Crime News
Nashik Crime News : पैशांच्या वादातून मालेगावला गोळीबार! एक जखमी, गावठी कट्ट्यांचा वापर

दबावाची चर्चा

दरम्यान, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहता संशयित शुभम पाटील हा मद्याच्या नशेत असल्याचे दिसून येते. त्यावेळी त्याने माझी बहीण पोलीस अधिकारी असल्याचाही दावा केला होता. प्रत्यक्ष घटनेच्यावेळी अंबड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असता, त्यांनी सार्यांना पोलीस ठाण्यात नेले.

त्यावेळी संशयित व त्याने दावा केलेल्या महिला पोलीस अधिकार्याने अंबड पोलिस ठाण्यात पोहोचून संबंधित युवतीला नुकसान भरपाईचे आश्वासन देत तक्रार न देण्यासाठी मध्यस्थी केली. प्रकरण मिटत असल्याने अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.

परंतु दुसऱ्या दिवशी संशयितासह मध्यस्थांनी कोणत्याही प्रकारे संपर्क साधला नाही की नुकसान भरपाईही करून दिली नाही. त्यामुळे युवतीने अंबड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र त्यामुळे संशयिताविरोधातील ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या गुन्ह्याला बगल देण्यासाठीच वेळकाढूपणा केल्याची चर्चा आहे.

Crime News
Panshet Crime: पानशेतमध्ये एकावर झाले कोयत्याने वार, पोलिसांनी केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.