Nashik Crime News : मद्यपीने फोडल्या कारच्या काचा; जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Latest Crime News : मुंबईला निघालेल्या एकाच्या कारच्या काचा फोडून दहशत पसरवली. तसेच कारचालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Crime news
Crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : आगार टाकळी परिसरातील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सराईताने मद्याच्या नशेत असताना मागील भांडणाची कुरापत काढत, मुंबईला निघालेल्या एकाच्या कारच्या काचा फोडून दहशत पसरवली. तसेच कारचालकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात सराईत गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Car windows broken by drunkard)

साहिल खरनारे (२०, रा. साईप्लाझा बिलिडंग, रामदास स्वामीनगर, आगार टाकळी, उपनगर) असे संशयिताचे नाव आहे. विलास दत्ताराम मोरे (रा. हरिदर्शन सोसायटी, रामदास स्वामीनगर, टाकळीरोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताशी त्यांचे काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.

रविवारी (ता.१३) पहाटे मोरे हे कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी कारने निघाले. पार्किंगमधून कार बाहेर काढत असतांना, मद्याच्या नशेतील संशयित साहिल याने जुन्या भांडणाची कुरापत काढून माेरे यांना शिवीगाळ केली. ‘आज तुला आज जिवंत सोडणार नाही’, असे धमकावत कारच्या पाठीमागील काचेवर लोखंडी रॉडने मारून काच फोडली. (latest marathi news)

Crime news
Jalgaon Crime News : बनावट नोटा प्रकरणी जिल्हापेठ पोलिस बऱ्हाणपूरला रवाना

घाबरलेले मोरे हे कारमधून बाहेर आले नाहीत. तर, त्यामुळे संशयिताने कारची समोरच्या काचेवर रॉडने मारून फोडली. त्यामुळे घाबरलेल्या मोरे यांनी आरडाओरडा केल्याने अपार्टमेंट व कॉलनीतील नागरिक जमा झाले. ते पाहून संशयित साहिल याने पळ काढला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी संशयित साहिल यास अटक केली आहे.

Crime news
Baba Siddique हत्या प्रकरणात मोठा खुलासा, Zeeshan Siddique यांनाही मारण्याचा प्लॅन? | Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.