Nashik Crime News : ओझरच्या डॉक्टरकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

Nashik News : रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रकमेचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Nashik Crime News
Nashik Crime Newsesakal
Updated on

Nashik News : येथील बाजारपेठेतील श्री. सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रकमेचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संशयित व्यक्ती एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. (case registered against 3 people who demanded extortion from Ozar doctor)

काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्‍वनाथ पाटील यांच्या श्री. सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या. महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले. त्यासाठी सुमारे अडिच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली.

रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले. मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहाय्यता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले. उर्वरित एक लाख ३२ हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी ६७ हजार ५०० रोख स्वरूपात जमा केले.

आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम संचालक डॉ. विश्‍वनाथ पाटील यांनी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले. नातेवाईकांनी देखील डॉक्टरांचे आभार मानत सत्कारही केला. काही दिवसांनंतर रुग्णाचे जावई म्हणून योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी अशा तिघांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे या रुग्णाकडून सहाय्यता निधी येऊनही रोख रक्कम का घेतली, असा जाब विचारला. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Monsoon News : दुष्काळी तालुक्यातील टॅंकरची संख्या घटली! जिल्ह्यात 350 टॅंकर सुरू

त्यावर डॉ. विश्‍वनाथ पाटील यांनी नातेवाईकांना सांगितलेली सर्व हकीकत पुन्हा जावई म्हणून योगेश पाटील याला सांगितली. परंतु, योगेश नाना पाटील ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तू हॉस्पिटल कसे चालवतो, बघून घेतो म्हणत दमबाजी करत शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी डॉ. पाटील यांनी पुन्हा योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विषय थांबवायचा असेल तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या.

अन्यथा, आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, असे सांगत थेट खंडणीची मागणी केली. खंडणी रक्कम देण्यास डॉ.पाटील यांनी नकार देताच तिघांनी सोशल मीडियावर बदनामी केली. अखेर डॉ. विश्‍वनाथ पाटील यांच्यासह ओझरच्या डॉक्टरांनी अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ओझर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले यांच्यासह अन्य एक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल दिनकर वाघेरे तपास करीत आहे.

Nashik Crime News
Nashik Bribe Crime : लाचखोर मनपा सहायक आयुक्ताच्या घरातून रोकड, सोने जप्त

दोघे मनसेचे पदाधिकारी?

योगेश नाना पाटील आणि जयेश वासुदेव ढिकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. योगेश नाना पाटील याने मागील काळात रोलेटविरोधात अशीच स्टंटबाजी सोशल मीडियावर केली होती. योगेश पाटील आणि जयेश ढिकले दोघेही मनसेचे निफाड तालुक्यातील पदाधिकारी असल्याची चर्चा आहे.

तीही बाब फिर्यादी डॉ. विश्‍वनाथ पाटील यांनी निदर्शनास आणून दिली असता तक्रार केली तर वीस लाख लागतील, आम्हाला सहा लाख द्या आणि विषय संपवा म्हणत मागणी सुरू ठेवली. परंतु, मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाटील आणि ढिकले यांच्यावर कारवाई करण्याचे सांगत पक्षाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

Nashik Crime News
Wakad Crime : घटस्फोटासाठी पत्नीचा मोटारीत डांबून छळ; भुलीचे दिले इंजेक्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.