Nashik Crime News : येवल्यातील त्या युवकावर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल!

Nashik News : येवला येथील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, आता सदरच्या युवकावरच पीडित अल्पवयीन मुलीने छळवणूक केल्याची तक्रार केली.
Nashik Crime News
Nashik Crime News esakal
Updated on

Nashik News : येथील मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, आता सदरच्या युवकावरच पीडित अल्पवयीन मुलीने छळवणूक केल्याची तक्रार केली असून, त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. येथील एका युवकाला अर्धनग्न अवस्थेत पाच ते सहा जणांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. (case registered against youth of Yeola under POCSO section)

त्यावर राज्यस्तरीय नेत्यांनी आवाज उठवल्यावर सुमारे पंधरा दिवसानंतर हा युवक तक्रार देण्यासाठी पुढे आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ॲट्रॉसिटीअंतर्गत कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता मारहाण झालेल्या युवकाविरोधातच अल्पवयीन मुलीने शहर पोलिस ठाण्यात शारीरिक त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. संबंधित युवक व त्याचा मित्र मला तीन ते चार महिन्यांपासून त्रास देत आहेत. (latest marathi news)

Nashik Crime News
Nashik Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची पोत खेचली; संशयित कारमधून झाले पसार

१७ जूनला मी ट्युशनला विठ्ठल नगर येथे जात असताना हे दोघे मोटरसायकलवर येऊन मला माझ्याबरोबर चल असे सांगू लागले. माझ्यासोबत आली नाहीतर ॲसिड टाकून देईल आणि तू ऐकले नाही तर तुझ्या बापाला मारून टाकेल, असा दम दिला.

त्यानंतर एका कॅफेमध्ये नेऊन माझ्याबरोबर अश्‍लिल चाळे केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश लोखंडे तपास करीत आहेत.

Nashik Crime News
Nashik Crime News : अपघात करून पसार मद्यतस्कर हजर; एक्साइज वाहन अपघात प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com