Nashik Crime News : गोवंशीयांची कत्तल करणारी टोळी जेरबंद! गुन्हेशाखा युनिट दोनची कामगिरी

Nashik Crime : भद्रकाली हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या अनधिकृत कत्तलखान्यावर शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकला.
Crime
Crimeesakal
Updated on

नाशिक : भद्रकाली हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या अनधिकृत कत्तलखान्यावर शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तब्बल १४०० किलो गोवंशीय मांस जप्त केले तर, डांबून ठेवलेली २० गोवंश जनावरांची सुटका करीत वाहने असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित १३ जणांना अटक केली असून, मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. ( Cattle slaughter gang arrested by police )

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गोवंश कत्तल व तस्करीला आळा घालण्याचे आदेश दिलेले आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या पथकाला मध्यरात्री गोवंश कत्तलीसंदर्भातील गोपनीय खबर मिळाली होती.

त्यानुसार, उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे, बाळू शेळके, विवेक पाठक, अंमलदार प्रकाश भालेराव, नंदकुमार नांदुर्डीकर, अतुल पाटील, जितेंद्र वजीर यांच्या पथकाने भद्रकाली पोलिसांच्या मदतीने तिग्रारानीया रोडवरील सागर बेकरीसमोर असलेल्या रजा नुरी इलेक्ट्रीकल गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यावर छापा टाकला.

Crime
Nashik Crime News : वैभव लहामगेच्या पोलिस कोठडीत वाढ

यावेळी बेकायदेशीरपणे काही गोवंशांची कत्तल करुन मांस लपविल्याचे आढळून आले. तसेच, एका बाजुला २० गोवंश जनावरे डांबून ठेवलेले होते. संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आहेत संशयित

अमीन अय्युब कुरेशी (२६, रा. बागवान पुरा), जुनेद नजीर कुरेशी (२१), अमीन नासीर पठाण (२०, दोघे रा. नानावली), ईस्माईल अनिस कुरेशी (२५, रा. पंचशिल नगर), रिजवान सुलेमान कुरेशी (२९), नईम रहीम कुरेशी (२४, दोघे रा. भारत नगर), सोनू महम्मद कुरेशी (२२, रा. बागवानपुरा), मोबीन युनुस कुरेशी (२६, रा. नाईकवाडी), मजीद अब्दुला कुरेसी (३२, रा. गंजमाळ), जावेद रहीम कुरेशी (२६, शिवाजीवाडी), आरीफ ईस्माईल शेख (३८, रा. कथडा), मुक्या कुरेशी आणि शब्बीर कुरेशी (रा. भद्रकाली)

Crime
Nashik Crime News : सिनेस्‍टाइल पाठलाग करत सराईतांना अटक; गावठी कट्टा हस्‍तगत, गंगापूर पोलिसांची कामगिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()