नाशिक : गेल्या महिन्यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाची झाडे तोडून चोरण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी तर चंदन तस्करांनी थेट वन विभागाचे मुख्य वनरक्षकांच्या बंगल्याच्या आवारातील चार चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याचा प्रकार आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षारक्षक युवराज शंकर जाधव (रा. वरवंडी ढकांबे, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, त्र्यंबक रोडवरील मुख्य वनसंरक्षक वास्तव्यास असलेल्या जारूल बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून जाधव हे कार्यरत आहेत. (Chandan was stolen from Chief Forest Guard bungalow )